Turkey Earthquake 
क्रीडा

Turkey Earthquake: तुर्कीच्या भूकंपात फुटबॉलपटूचा मृत्यू

तुर्कस्तान आणि सीरियातील प्राणघातक भूकंपांमुळे आतापर्यंत ८ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

तुर्कस्तान आणि सीरियातील प्राणघातक भूकंपांमुळे आतापर्यंत ८ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कीमध्ये गेल्या काही दिवसात ७.८, ७.६ आणि ६.० तीव्रतेचे सलग तीन विनाशकारी भूकंप आले. दरम्यान, मोठी माहिती समोर आली आहे. एका फुटबॉलपटूचा मृत्यू झाला आहे. (Turkey Earthquake Goalkeeper Ahmet Eyup Turkaslan 28 Dies)

या विनाशकारी भूकंपात तुर्कीचा २८ वर्षीय फुटबॉलपटू अहमत इयुप तुर्कस्लानचाही मृत्यू झाला आहे. अहमत इयुप तुर्कस्लानच्या मृत्युच्या बातमीनंतर फुटबॉलविश्वात शोककळा पसरली आहे.

अहमत इयुप हा मागील दहा वर्षांपासून वरिष्ठ स्तरावरील फुटबॉल मध्ये खेळत होता. त्याने आतापर्यंत पाच विविध संघांचे प्रतिनिधित्व केलेले. यादरम्यान त्याने 87 सामने खेळले आहेत.

काही दिवसांपूर्वीच त्याचा विवाह देखील झालेला. दरम्यान, ६ फेब्रुवारी झालेल्या भूकंपात तो ढिगाऱ्याखील अडकला गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ७ फेब्रुवारीला बचाव पथकाला त्याचे शव मिळाले.

तुर्की आणि सिरियामध्ये सोमवारी तीन मोठे भूकंप झाले. यात दोन्ही देशात हाहाकार उडाला. पत्त्याप्रमाणे इमारती कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली. ८ हजारांहून अधिक नगिरकांचा यात मृत्यू झाला असून मृतांचा आकड्यात आणखी वाढ होण्याती भीती व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पैशासाठीच प्रमोद महाजनांची हत्या? प्रवीण महाजन भावाला करत होते ब्लॅकमेल'; प्रकाश महाजनांच्या दाव्यावर काय म्हणाल्या सारंगी महाजन?

Gadhinglaj Accident:'मोटारीच्या धडकेत रिक्षातील महिला ठार'; आठ जण जखमी: संकेश्वर - बांदा महामार्गावर दुर्घटना

Latest Marathi News Live Update : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

Gold Rate Today : सोन्याचे भाव घसरले! चांदीच्या भावातही मोठी घट; जाणून घ्या आजचे भाव

Prithvi Shaw : २८ चौकार, ३ षटकार! पृथ्वी शॉ याचे विक्रमी द्विशतक; रवी शास्त्री यांचा विक्रम थोडक्यात वाचला, वीरेंद्र सेहवागच्या पंक्तित जाऊन बसला

SCROLL FOR NEXT