Uday Saharan sakal
क्रीडा

Uday Saharan : 'ही माझ्या वडिलांची स्टाईल' वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचताच कर्णधाराने सांगितलं बॅटिंगचं सिक्रेट

भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारनने केले मोठे वक्तव्य...!

Kiran Mahanavar

U19 world cup 2024 captain Uday Saharan : अंडर-19 वर्ल्ड कप 2024 च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 2 गडी राखून पराभव केला. आफ्रिकन संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला विजयासाठी 245 धावांचे लक्ष्य दिले. उदय सहारन आणि सचिन धस यांच्या धमाकेदार खेळीमुळे टीम इंडियाने ही कामगिरी केली. टीम इंडियाने सलग पाचव्यांदा अंडर-19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारनने मोठे वक्तव्य केले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-19 संघाविरुद्ध विजय नोंदवल्यानंतर भारतीय कर्णधार उदय सहारनने सामन्यानंतरच्या सादरीकरणात एक मोठे विधान केले आणि म्हणाला की, माझ्यावर कोणत्याही वेळी दबाव आला नाही. होय, एकेकाळी आपण खूप मागे होतो. पण शेवटपर्यंत लढायचे होते. भागीदारीचा मुद्दा होता. पण मला हे माझ्या वडिलांकडून मिळाले आहे, ते पण क्रिकेट खेळायचे आणि सामना शेवटपर्यंत घेऊन जायचे. मी जेव्हा फलंदाजीला आलो तेव्हा चेंडू थोडा हलत होता आणि चांगला बाउन्स ही मिळत होता. पण नंतर चेंडू अधिक चांगल्या प्रकारे बॅटवर येऊ लागला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया एकेकाळी अत्यंत कठीण परिस्थितीत होती. भारतीय संघाने 32 धावांत चार विकेट गमावल्या होत्या, मात्र यानंतर कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस यांनी स्फोटक खेळी खेळली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी केली. जी अंडर-19 वर्ल्ड कपमधील पाचव्या विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी आहे. सहारनने 81 धावांची तर सचिनने 96 धावांची खेळी खेळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT