केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघ (WFI) नवनिर्वाचित मंडळाची मान्यता रद्द केली.  
क्रीडा

... मला काही घेणं देणं नाही! WFI चे पदाधिकारी निलंबीत झाल्यानंतर ब्रिजभूषण यांनी केले हात वर

मंत्रालयाने WFI चे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग यांनाही निलंबित केले आहे. संजय सिंह हे भाजप खासदार आणि WFI चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते.

Sandip Kapde

Brijbhushan Sharan Singh: केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघ (WFI) नवनिर्वाचित मंडळाची मान्यता रद्द केली. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याच्या घाईमुळे कुस्ती महासंघावर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच  ही प्रक्रिया घाईत झाली त्यामुळे हे मंडळ जुन्या कुस्ती मंडळाच्या नियंत्रणाखाली असल्याचे कारण क्रीडा मंत्रालयाने सांगितले आहे.

मंत्रालयाने WFI चे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग यांनाही निलंबित केले आहे. संजय सिंह हे भाजप खासदार आणि WFI चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते.

संजय सिंग यांनी भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक जिंकली आणि ते अध्यक्ष होणार हे निश्चित झाल्यापासूनच कुस्तीप्रेमींनी यावर आक्षेप घेतला होता. संजय सिंह हे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे आहेत आणि अशा परिस्थितीत WFI मध्ये कोणत्याही सुधारणा होण्याची आशा नसल्याचे कुस्तीपटूंनी सांगितले. (Latest Marathi News)

दरम्यान केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित संस्थेला निलंबित केल्यानंतर, माजी WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लोकशाही पद्धतीने निवडणुका घेण्यात आल्या आणि मंडळाची स्थापना झाली... आता फेडरेशन सदस्यांचा निर्णय आहे की त्यांना सरकारशी बोलायचे आहे की कायदेशीर कारवाई करायची आहे. मला याच्याशी काही देणेघेणे नाही"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT