BCCI Media Rights esakal
क्रीडा

BCCI Media Rights : प्रसारण हक्क अंबानींच्या खिशात! डिज्ने स्टारला मागं टाकत व्हायकॉम 18 ने बाजी मारली

अनिरुद्ध संकपाळ

BCCI Media Rights : बीसीसीआयच्या माध्यम हक्काचा लिलाव हा व्हायकॉम 18 ने जिंकला. त्यांनी डिज्ने स्टारला मागे टाकत भारताच्या द्विपक्षीय मालिकांसाठीचे माध्यम हक्क मिळवले आहे. हे माध्यम हक्क पुढच्या 5 वर्षांसाठी असणार आहे.

डिज्ने स्टार आणि सोनी स्पोर्ट्स नेटवर्क या शर्यतीत मागे पडले. मुकेश अंबानींच्या व्हायकॉम 18 ने या लिलावात जवळपास 6000 कोटींच्या पुढे रक्कम मोजली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बीसीसीआयला एका सामन्यासाठी जवळपास 67.8 कोटी रूपये मिळण्याची शक्यता आहे. (Viacom18 Seal Both TV & Digital Rights)

व्हायकॉम 18 ने बीसीसीआयच्या द्विपक्षीय मालिकांचे प्रसारण हक्क जिंकल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करून माहिती दिली. ते म्हणाले की, 'बीसीसीआय प्रसारण हक्क लिलाव जिंकणाऱ्या व्हायकॉम 18 चे अभिनंदन. त्यांनी टेलिव्हिजन प्रसारण हक्क आणि डिजीटल प्रसारण हक्क पुढच्या 5 वर्षासाठी मिळवले आहेत.'

'आयपीएल आणि वुमन्स प्रीमियर लीग दोन्ही स्पर्धांमधील व्हायकॉम 18 सोबतच्या भागीदारीनंतर आता भारतीय क्रिकेट वाढीत ते बीसीसीआय प्रसारण हक्काद्वारेही योगदान देणार आहेत.'

जय शहा पुढे म्हणाला की, 'स्टार इंडिया आणि डिज्ने प्लस हॉट स्टारचे देखील आभार, त्यांनी बरीच वर्षे आम्हाला साथ दिली. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहचण्यासाठी तुम्ही महत्वाची भुमिका बजावली आहे.'

स्टार स्पोर्ट्सने भारताच्या आंतरराष्ट्रीय आणि स्थान सामने जवळपास 11 वर्षे प्रसारित केले. 2012 पासून देशात क्रिकेट बद्दलचं प्रेम वाढवण्यात आपले मोठे योगदान दिले आहे.

व्हायकॉम 18 ने यापूर्वी आयपीएल (Digital), महिला आयपीएल (WIPL), ऑलिम्पिक 2024, दक्षिण आफ्रिकेचे 2024 मधील मायदेशातील सामने, टी 10 लीग, रोड सेफ्टी सिरीज, एनबीए, सिरीज A, ला लिगा, लिग 1, डायमंड लीग. या स्पर्धांचे प्रसारण हक्क देखील मिळवले आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT