Virat Kohli 500th Match esakal
क्रीडा

Virat Kohli 500th Match : किंग कोहली @500! गांगुलीला जे जमलं नाही ते विराट करून दाखवणार

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli 500th Match : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खूप खास आहे. विराट कोहलीचा हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना असून भारताकडून 500 सामने खेळणारा तो चौथ्या खेळाडू ठरला आहे. तो आता सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी यांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे.

विराट कोहलीच्या या खास माईल स्टोनचा साक्षीदार खुद्द राहुल द्रविड देखील होणार आहे. राहुल द्रविड हा भारतीय संघाचा प्रशिक्षक आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) विराट कोहलीच्या 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्याबद्दल म्हणाला की, 'मला वाटतं की हे खूप भारी आहे. या संघातील अनेक खेळाडूंसाठी विराट कोहली हे प्रेरणास्थान आहे. भारतात देखील अनेक मुला मलींना तो प्रेरणा देतो.' (Virat Kohli News)

विराट कोहलीने आतापर्यंत 499 आंतरराष्ट्रीय सामन्यात 25 हजार 461 धावा केल्या असून यात 75 शतकी खेळींचा समावेश आहे. राहुल द्रविडला वाटते की तो अजून बरेच रेकॉर्ड ब्रेक करणार आहे.

द्रविड म्हणाला की, 'त्याचे आकडेच सर्वकाही बोलून जातात. त्याच्या सर्व खेळी या रेकॉर्ड बूकमध्ये नोंदवल्या गेल्या आहेत. त्याची कष्ट करण्याची वृत्ती आणि इच्छाशक्ती स्वतः पाहायला मिळणे हेच खूप भारी आहे. हे कोणालाही पाहता येत नाही. त्यामुळेच तो 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकला.'

विराट कोहली आपले बहूप्रतिक्षित 29 वे कसोटी शतक विंडीजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत ठोकण्यासाठी आतुर असेल.

राहुल द्रविड पुढे म्हणाला की, 'विराट कोहली अजूनही चांगला फिटनेस राखून आहे. तो खूप फिट, उर्जा आणि उत्साह असलेला खेळाडू आहे. जरी तो 500 वा सामना खेळत असला तरी तो अजून 12 ते 13 वर्षे नक्कीच खेळू शकतो.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT