Virat Kohli esakal
क्रीडा

Virat Kohli : विराटनं 49 शतकांची बरोबरी नाही केली मात्र सचिनचा एक खास विक्रम मोडलाय

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli : विराट कोहलीने आज आपला फेव्हरेट विरोधी संघ श्रीलंकेविरूद्ध 94 चेंडूत 88 धावांची खेळी केली. तो आज भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वनडेमधील 49 शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करेल असे वाटत होते. मात्र वानखेडेवर अवघ्या 12 धावांनी त्याचे शतक हुकले. यानंतर विराट चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली.

मात्र विराट कोहली जरी सचिनच्या 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी करू शकला नाही तरी त्याने सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडलाय. विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचे वनडे क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिकवेळा 1000 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम मोडला.

सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमध्ये 7 कॅलेंडर वर्षात 1000 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आता विराट कोहलीने 8 कॅलेंडर वर्षात वनडेमध्ये 1000 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे.

विराट कोहलीने श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात वनडे क्रिकेटमधील आपले 70 वे अर्धशतक ठकले. याचबरोबर विराट कोहलीने श्रीलंकेचा दिग्गज माजी फलंदाज कुमार संगकाराचे एक रेकॉर्ड देखील मोडले. विराट कोहलीने वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याचा (सलामीवीर नसलेला फलंदाज) विक्रम मागे टाकला. विराट कोहलीचे 13 तर कुमार संगकाराचे 12 अर्धशतके झाली आहेत.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर शुभमन गिल 92 तर विराट कोहली 88 धावा करून बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने नाबाद अर्धशतकी खेळी करत भारताला 300 पार पोहचवले. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने भारताची टॉप ऑर्डर उडवत 4 विकेट्स घेतल्या आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT