Anderson-VIrat 
क्रीडा

विराट फक्त 'त्या' प्रकारच्या पिचवरच चांगलं खेळू शकतो- अँडरसन

विराज भागवत

वाचा, नक्की काय म्हणाला जेम्स अँडरसन

Ind vs Eng Test: भारतीय संघाला इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत (Ind vs Eng Test Series) फारच चढ उतार पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात भारत (Team India) जिंकणार अशी चर्चा असताना पाऊस पडला. दुसरा सामना भारताने एकतर्फी जिंकला. तर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघावर दारूण पराभवाची नामुष्की ओढवली. या साऱ्या गोंधळानंतर भारतीय संघ चौथ्या सामन्यासाठी कसून तयारी करतो आहे. पराभवानंतर दमदार पुनरागमन कसं करायचं ते भारतीय संघाला चांगलंच माहिती आहे, असं विधान विराटने (Virat Kohli) तिसऱ्या कसोटीत केलं होतं. त्यानंतर आता इंग्लंडचा (England) जेम्स अँडरसन (James Anderson) याने विराटबद्दल एक महत्त्वाचं विधान केलं.

"विराट कोहली बदललाय की नाही मला माहिती नाही. पण त्याच्या फलंदाजीबद्दल बोलायचं तर त्याच्या फलंदाजीच्या तंत्रात थोडीशी समस्या असल्याचं दिसतंय. त्यामुळेच त्याच्या धावा होत नाहीत. इंग्लंडच्या पीचवर ज्याप्रकारे चेंडू वेगाने जातो, त्याचा फटका विराटच्या तंत्राला बसलाय. विराटने आमच्याविरूद्ध मुंबईत द्विशतक ठोकलं तिथे चेंडू त्या वेगाने येत नव्हते. इथे इंग्लंडमध्ये मात्र चेंडू स्विंग होतोय आणि त्यामुळेच विराट लगेच बाद होतोय. वेगवान नसलेल्या खेळपट्ट्यांवर विराट चांगली फलंदाजी करतो. सध्या विराटची फलंदाजी फारशी चांगली होत नाही हेच खरं आहे. पण त्याला कमी लेखून चालणार नाही. कारण जर तुम्ही त्याला मारण्यासाठी चेंडू दिलात, तर मात्र तो तुम्हाला सीमारेषेपार पोहोचवेल", असं अँडरसन म्हणाला.

James Anderson

इंग्लंडच्या माजी कर्णधाराने विराटला डिवचलं...

"विराट कोहली यंदाच्या कसोटी मालिकेत अजूनही स्थिरावलेला दिसत नाही. कोणते चेंडू सोडावेत आणि कोणते खेळावेत याबद्दल त्याच्या मनात कायम संभ्रम दिसून येतोय. या मालिकेत असे अनेक चेंडू होते जे त्याने सोडायला हवे होते, पण त्याने ते चेंडू खेळले. त्याच्यात मला थोडासा तंत्रशुद्धपणाचा अभाव दिसतोय. मी वेळोवेळी याबद्दल बोललो आहे. तशातच त्याच्या पायाची हालचाल हादेखील एक मोठा मुद्दा आहे. अँडरसन आणि रॉबिन्सनच्या गोलंदाजीचा सामना करणं विराटला कठीण जातंय हे स्पष्ट दिसतं", असं विधान इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT