Virat Kohli Stand On Adelaide Cricket Ground MS Dhoni
Virat Kohli Stand On Adelaide Cricket Ground MS Dhoni  esakal
क्रीडा

Virat Kohli : अॅडलेडवर विराट कोहलीचं स्टँड.... धोनीचा 6 वर्षापूर्वीचा VIDEO व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Adelaide T20 World Cup 2022 : भारताने अॅडलेडवर झालेल्या बांगलादेशविरूद्धचा सामना अवघ्या 5 धावांनी जिंकत टी 20 वर्ल्डकप 2022 च्या सेमी फायनलचे आपले तिकिट निश्चित केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 20 षटकात 184 धावांपर्यंत मजल मारली होती. यात विराट कोहलीच्या 44 चेंडूत केलेल्या नाबाद 64 धावांचे मोठे योगदान होते. सामनावीराचा पुरस्कार देखील विराट कोहलीलाच देण्यात आला. सामना सुरू होण्यापूर्वीच विराट कोहली अॅडलेडवर धमाका करणार हे निश्चित होते. कारण त्याचे ऑस्ट्रेलियातील अॅडलेडवरील ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त आहे. दरम्यान, सामना झाल्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा सहा वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला.

विराट कोहली - अॅडलेड अन् धावांचा पाऊस हे समीकरण ठरलेलेच असते. विराट कोहलीचा हा ऑस्ट्रेलियातील बालेकिल्ला आहे. या मैदानावर विराट कोहली हमखास धावा करतोच. त्यामुळे अॅडलेडवर भारताचा विजय निश्चित असतो. दरम्यान, 2016 मध्ये महेंद्रसिंह धोनीला विराट कोहली आणि अॅडलेडबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी एमएस धोनीने एक भन्नाट उत्तर दिले होते. धोनी म्हणाला होता की, 'ज्या प्रकारे विराट कोहली अॅडलेडवर धावा करतोय ते पाहता या ग्राऊंडवर एका स्टँडला विराट कोहलीचं नाव दिलं पाहिजे.'

महेंद्रसिंह धोनी 2016 मध्ये विराट कोहली ऑस्ट्रेलियात धावांचा पाऊस पाडतो त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या ग्राऊंड्सवर विराट कोहलीच्या नावाचे स्टँड असायला हरकत नाही.

दरम्यान, बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, 'ज्यावेळी वर्ल्डकप ऑस्ट्रेलियात होणार आहे हे कळलं त्यावेळी मी खूप आनंदी झालो होतो. माला माहिती होतं की इथे कोणते क्रिकेटिंग शॉट्स खेळायला पाहिजेत. मला ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव आहे. त्याचा ऑस्ट्रेलियात खेळताना संघाला फायदा झाला. मला अॅडलेडवर खेळायला खूप आवडतं. मी नेट्समध्ये बॅटिंग करताना ग्राऊंडवर येताना मला घरी असल्याचाच भास होत होता. एमसीजीवरील ती इनिंग माझ्या खूप जवळची आहे. मात्र अॅडलेडवर आल्यावर मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेतो.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT