Virat Kohli Takes a Wicket After Nine Years! Star Cricketer Dismisses Scott Edwards During  
क्रीडा

Virat Kohli : गोलंदाजीत कोहलीने घातला धुमाकूळ! ९ वर्षांनंतर विकेट घेत चाहत्यांना दिली 'दिवाळी भेट'

Kiran Mahanavar

Virat Kohli Takes ODI Wicket After 9 Years For India : टीम इंडियाने या वर्ल्ड कपमध्ये आपल्या कामगिरीने चाहत्यांना खूश केले आहे. आता उपांत्य फेरीतही अशाच चमत्कारांची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

मात्र, उपांत्य फेरीपूर्वी टीम इंडियाने दिवाळीत आपला शेवटचा साखळी सामना खेळला आणि इथेही भारतीय खेळाडूंनी निराश केले नाही. खासकरून स्टार फलंदाज विराट कोहलीने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर चाहत्यांना आनंदी होण्याची अनेक कारणे दिली.

कोहलीला येथे शतक झळकावता आले नाही, पण त्याच्या बॅटमधून आणखी एक अर्धशतक आले आणि त्यानंतर त्याने या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिली विकेटही घेतली.

बंगळुरूमध्ये रविवारी झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने आपल्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले. प्रथम, श्रेयस अय्यर, केएल राहुल यांनी शानदार शतके झळकावली, तर कर्णधार रोहित शर्मा, कोहली आणि शुभमन गिल यांनी उत्कृष्ट अर्धशतके झळकावली. त्याच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 410 धावांची जबरदस्त धावसंख्या उभारली.

या सामन्यात कोहली नेदरलँड्सच्या डावातील 23 वे षटक टाकायला आला आणि त्याच्या स्पेलच्या दुसऱ्याच षटकात त्याने विरोधी कर्णधार चार्ल्स एडवर्ड्सलाही बाद केले. या वर्ल्ड कपमध्ये कोहली दुसऱ्यांदा गोलंदाजी करताना दिसला. यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी केली होती. त्या सामन्यात त्याने फक्त तीन चेंडू टाकले आणि हार्दिकचे ओव्हर पूर्ण केले होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''आरोपींच्या विरोधात शब्दही न बोलणारे लोकप्रतिनिधी...'', धनंजय देशमुखांचा मुंडेंवर घणाघात

माधुरीचं 'हे' गाणं अश्लिल म्हणत कोर्टाने केलेलं बॅन, दूरदर्शन, रेडिओवर सुद्धा गाणं वाजवण्यास होती बंदी

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर लाठीचार्ज प्रकरण 30 अटकेत असलेल्या सर्व आरोपीना मिळाला जामीन

Kojagiri Pournima : किल्ले रायगड आजही विसरू शकणार नाही कोजागिरीशी जोडला गेलेला शिवाजी महाराजांचा इतिहास, हिरा बनली हिरकणी...

Natural Cough Relief for Children: धोकादायक कफ सिरप नकोच..! लहान मुलांना खोकला झाल्यावर 'हा' रामबाण उपाय करा

SCROLL FOR NEXT