West Indies Vs India 2nd ODI  esakal
क्रीडा

WI vs IND 2nd ODI : वेस्ट इंडीजने भारताचा 6 विकेट्स राखून केला पराभव, मालिका 1 - 1 बरोबरीत

अनिरुद्ध संकपाळ

West Indies Vs India 2nd ODI : वेस्ट इंडीजने भारताचे 182 धावांचे आव्हान 36 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. विंडीजचा कर्णधार शे होपने नाबाद 63 धावांची दमदार खेळी केली. त्याला केसी कार्टीने नाबाद 48 धावा करत चांगली साथ दिली. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मालिका आता 1 - 1 अशी बरोबरीत आली आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या विंडीजने भारताचा पहिला डाव 181 धावात गुंडाळला. भारताकडून सलामीवीर इशान किशनने सर्वाधिक 55 धावांचे योगदान दिले. मात्र इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. विंडीजकडून शेफर्ड, गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

54-2 : शार्दुल ठाकूरने दिले दोन धक्के

विंडीजच्या सलामीवीरांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचल्यानंतर शार्दुल ठाकूरने दोन्ही सलामीवीरांना नवव्या षटकात बाद केले. मेयर्स 36 तर किंग 15 धावा करून बाद झाला.

विंडीजची दमदार सुरूवात 

भारताने 182 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजने दमदार सुरूवात केली. सलामीवीर ब्रँडन किंग आणि कायल मेयर्स यांनी 53 धावांची सलामी दिली.

भारताचा डाव 181 धावात संपुष्टात

भारताच्या सात विकेट्स 150 च्या आत गेल्यानंतर शार्दुल ठाकूरने 16 धावांची खेळी करत भारताला थोड्याफार सन्मानजनक धावसंख्येजवळ पोहचवले. कुलदीपने नाबाद 8 धावा केल्या तर मुकेशने 6 धावांचे योगदान देत भारताला 181 धावांपर्यंत पोहचवले.

सूर्या - जडेजाचा डाव सावरण्याचा प्रयत्न मात्र...

भारताचा निम्मा संघ 113 धावात माघारी गेल्यानंतर सूर्युकमार यादव आणि रविंद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी रोमारियो शेफर्डने फोडली. त्यानंतर डावखुऱ्या गुडकेश मोतीने पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवची शिकार केली. सूर्यकुमार यादव 24 धावांवर बाद झाला.

113-5 (24.1 Ov) : पावसामुळे सामना थांबला

विंडीजने भारताचा निम्मा संघ 113 धावात गारद केल्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला.

113- 5 : भारताची हाराकिरी 

भारताच्या फलंदाजीने दमदार सुरूवात करत नाबाद 90 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर विंडीजच्या गोलंदाजांनी भारताच्या एका पाठोपाठ एक अशा 5 फलंदाजांना अवघ्या 23 धावात पॅव्हेलियनमध्ये परतले.

भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या 7 धावा करून बाद झाला अन् त्याच्या पुढच्याच षटकात संजू सॅमसनला करीआने 9 धावांवर बाद केले.

अक्षर पटेल आल्या पालवी माघारी 

इशान किशन बाद झाल्यानंतर आलेल्या अक्षर पटेलला अवघी एक धाव करता आली. त्याला शेफर्डने आपल्या बाऊन्सरने चकवा दिला.

95-2 : इशान किशन बाद 

शुभमन गिल बाद झाल्यानंतर इशान किशन देखील 5 धावांची भर घालून 55 धावांवर बाद झाला. शेफर्डच्या गोलंदाजीवर अथनाजेने त्याचा एक सुंदर झेल टिपला.

IND 89/0 (16.2) : इशान किशनचे सलग दुसरे अर्धशतक 

भारताचा सलामीवीर इशान किशनने विंडीजविरूद्धच्या सलग दुसऱ्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याने गिलसोबत 90 धावांची सलामी दिली. मात्र यानंतर गिल 48 चेंडूत 34 धावा करून बाद झाला.

भारताची अर्धशतकी सलामी

भारताची युवा सलामी जोडी शुंभमन गिल आणि इशान किशन यांनी दुसऱ्या वनडे सामन्यात 11 षटकात अर्धशतकी सलामी दिली.

वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकली

वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघात मोठे बदल

दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने आपल्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल केले आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती दिली असून त्याच्या जागी अक्षर पटेल आणि संजू सॅमसन यांना संधी देण्यात आली. संघाचे नेतृत्व उपकर्णधार हार्दिक पांड्या करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT