West Indies Vs India 2nd Test  esakal
क्रीडा

WI vs IND 2nd Test : विराट ऐतिहासिक शतकाच्या जवळ मात्र विंडीजने दिवस अखेर भारतचा दिले चार धक्के

अनिरुद्ध संकपाळ

West Indies Vs India 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी भारताने आपल्या पहिल्या डावात 4 बाद 288 धावा केल्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 80 तर विराट कोहलीने नाबाद 87 धावांची खेळी केली. रविंद्र जडेजा देखील 36 धावा करून नाबाद होता. विंडीजकडून गॅब्रिएल, रोच, होल्डर, वॉरिकन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तिसरे सत्र विराटच्या नावावर

दुसऱ्या सत्रात वेस्ट इंडीजने भारताचे चार फलंदाज बाद करत सत्रावर निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. तिसऱ्या सत्रात अजिंक्य रहाणे देखील 8 धावांची भर घालून परतला होता. मात्र आपला 500 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या विराटने पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात आपली छाप सोडली. त्याने दिवसअखेर नाबाद 87 धावांची खेळी केली. त्याला साथ देणाऱ्या रविंद्र जडेजाने दिवसअखेर नाबाद 36 धावा केल्या होत्या.

182-4 : चहा लागणार कडू 

पहिल्या सत्रात एकही फलंदाज न गमावणाऱ्या भारताला विंडीजने दुसऱ्या सत्रात पाठोपाठ धक्के दिले. चहापानापर्यंत खेळ थांबला त्यावेळी भारताच्या 4 बाद 182 धावा झाल्या होत्या. अजिंक्य रहाणेला गॅब्रिएलने 8 धावांवर बाद करत चौथा धक्का दिला.

155-3 : विंडीजचे जोरदार पुनरागमन 

वेस्ट इंडीजने दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या सत्रात जोरदार पुनरामगन केले. पहिल्या सत्रातच भारताला शंभरी पार केल्यानंतर लंचनंतर जेसन होल्डरने यशस्वीला (57), रोचने शुभमन गिलला (10) तर वॉरिकेनने शतकाच्या जवळ पोहचलेल्या रोहित शर्माला 80 धावांवर बाद केले.

139-1 (31.4 Ov) : यशस्वी जैसवाल बाद 

लंचनंतर भारतीय सलामी जोडी अजून मोठी सलामी भागीदारी देईल असे वाटत होते. यशस्वी जैसवालकडे दुसऱ्या सामन्यात देखील शतकी खेळी करण्याची संधी होती. मात्र तो 57 धावा करून जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने रोहित शर्मासोबत 139 धावांची सलामी दिली.

रोहित - यशस्वीची शतकी भागीदारी 

रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवाल यांनी पहिल्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात 130 धावा चोपून काढत दमदार सुरूवात केली. रोहित शर्माने संथ सुरूवातीनंतर आधी अर्धशतक झळकावले. तर यशस्वी जैसवालने देखील आपल्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत दुसऱ्या कसोटीत देखील अर्धशतकी खेळी केली.

रोहित शर्माचे अर्धशतक

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी रोहित शर्माने संथ सुरूवात केली. मात्र खेळपट्टी फलंदाजीला पोषक आहे याचा अंदाज आल्यानंतर रोहित शर्माने आपला गिअर बदलला. त्याने 75 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यात बरोबर यशस्वी जैसवाल आणि रोहितने सलग दुसऱ्या सामन्यात शतकी सलामी दिली.

52-0 (12.2 Ov) : यशस्वी - रोहितची भागिदारी 

पहिल्या कसोटीप्रमाणे दुसऱ्या कसोटीत देखील भारताची नवी सलामी जोडी यशस्वी जैसवाल आणि रोहित शर्मा यांनी मोठी सलामी देण्याच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी पहिल्या 12 षटकात अर्धशतकी भागीदारी रचली.

यशस्वी जैसवालने आक्रमक फलंदाजी करत बॉल टू रन धावा करत आहे. तर रोहित शर्माने सावध पवित्रा धारण केला आहे.

वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकली 

वेस्ट इंडीजने दुसऱ्या कसोटीत देखील नाणेफेक जिंकली असून यावेळी त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आपल्या संघात एक बदल केला असून शार्दुल ठाकूरच्या जागी मुकेश कुमारला कसोटी पदार्पणाची संधी दिली आ

भारत विंडीज 100 वा सामना 

भारत आणि वेस्ट इंडीज क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळवला जाणारा दुसरा कसोटी साना हा या दो दोन्ही देशांमधील 100 वा सामना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

SCROLL FOR NEXT