T20 World Cup  sakal
क्रीडा

T20 World Cup : भारतासाठी विश्‍वकरंडक जिंकायचाय - तिलक वर्मा

पहिल्याच टी-२० लढतीत ठसा उमटवणाऱ्या खेळाडूचे ध्येय

सकाळ वृत्तसेवा

तारौबा : भारतीय क्रिकेट संघाला पहिल्या टी-२० लढतीत वेस्ट इंडीजकडून चार धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र या लढतीत एका नव्या दमाच्या खेळाडूने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले.

आपल्या कारकीर्दीतील पहिलाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या तिलक वर्मा याने भारताकडून सर्वाधिक ३९ धावांची खेळी साकारली. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून त्याच्यासोबत झालेल्या संवादाचा व्हिडिओ जारी केला. तिलक वर्मा याप्रसंगी म्हणाला, ‘‘भारतासाठी विश्‍वकरंडक जिंकायचा आहे.’’

‘‘अगदी लहानपणापासून भारताला विश्‍वकरंडक जिंकून देण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले. मी अमुक स्थानावर फलंदाजीला येईन आणि भारताला विश्‍वकरंडक जिंकून देईन, अशी कल्पना माझ्या डोळ्यांसमोर दररोज येते.

आता मला भारतीय संघाची जर्सी मिळाली आहे. त्यामुळे विश्‍वकरंडक जिंकण्याचे स्वप्नही पूर्ण होईल, असा विश्‍वास आहे, ’’ असे तिलक म्हणाला. ‘‘भारतासाठी खेळण्याचे स्वप्न मीही बघितले होते, पण ते इतक्या लवकर पूर्ण होईल असे वाटले नव्हते,’’ असेही तो म्हणाला.

कर्णधार हार्दिककडूनही कौतुक

भारतीय टी-२० संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या यानेही तिलक वर्माच्या फलंदाजीचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात षटकार मारून करणे ही सोपी बाब नव्हे. तिलककडे कमालीचा आत्मविश्‍वास आहे. तो निडर आहे. भारतासाठी तो संस्मरणीय कामगिरी करू शकतो.’’

दोन्ही संघांना दंड

भारत-वेस्ट इंडीज यांच्यामधील पहिल्या टी-२० लढतीनंतर दोन्ही संघांतील खेळाडूंना दंड ठोठावण्यात आला. निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकल्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंच्या मानधनातून पाच टक्के रक्कम कापण्यात येणार आहे.

तसेच वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी दोन षटके कमी टाकल्यामुळे त्यांच्या मानधनातून दहा टक्के रक्कम कापण्यात येणार आहे. आयसीसीच्या एलिट पॅनेलचे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT