Dunith Wellalage  esakal
क्रीडा

Dunith Wellalage : भारताचा निम्मा संघ गारद करणारा 20 वर्षाचा वेल्लालागे आहे तरी कोण?

अनिरुद्ध संकपाळ

Dunith Wellalage Profile : आशिया कप 2023 च्या सुपर 4 मध्ये श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात भारताची फलंदाजी ढेपाळली. आदल्या दिवशीच पाकिस्तानविरूद्ध 356 धावांचा डोंगर उभारणारी टीम इंडिया 213 धावात गारद झाली. भारताने बिनबाद 80 धावा करत दमदार सुरूवात केली होती. मात्र लंकेचा 20 वर्षाचा डावखुरा फिरकी गोलंदाज दुनिथ वेल्लालागेने भारताचा निम्मा संघ गारद केला.

त्याने शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांना बाद केले. विशेष म्हणजे त्याच्या या वनडे क्रिकेटमधील पहिल्याच पाच विकेट्स आहेत. पाकिस्तानविरूद्ध स्टार झालेल्या केएल राहुल, विराट कोहलीची विकेट घेणाऱ्या या वेल्लालागे एका रात्रीत स्टार झाला आहे. हा लंकेचा नवा खेळाडू कोण अशी सर्वजण चर्चा करत आहेत.

कोण आहे दुनिथ वेल्लालागे?

- दुनिथ वेल्लालागेचा जन्म कोलंबोचाच आहे. त्याने आपले शालेय शिक्षण कोलंबोच्या सेंट जोसेफ कॉलेजमधून पूर्ण केले.

- तो कॉलेजच्या संघाकडून खेळ होता. त्यानंतर त्याला अ श्रेणीचे सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याने लंकन क्रिकेट क्लबकडून 2019 - 20 मध्ये अ श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

- वेल्लालागेच्या अष्टपैलू कामगिरीने निवडसमितीचे लगेचच लक्ष वेधून घेतले. त्यानंतर त्याला श्रीलंका 19 वर्षाखालील संघाचा कर्णधार करण्यात आलं. त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंका 2022 मध्ये 19 वर्षाखालील वर्ल्डकप खेळला.

- ही स्पर्धा वेल्लालागेच्या कारकिर्दीसाठी गेम चेंजर ठरली. तो 17 विकेट्स घेत वर्ल्डकपमधील सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला. याचबरोबर त्याने श्रीलंकेकडून 6 सामने खेळत 264 धावा देखील केल्या.

- या कामगिरीच्या जोरावर त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

- त्याच्या पुढच्याच महिन्यात त्याची श्रीलंकेच्या कसोटी संघात देखील निवड झाली. त्याने पहिला कसोटी सामना पाकिस्तानविरूद्ध खेळला. वेल्लालागेला लंका प्रीमीयर लीगमध्ये जाफना किंग्जकडून देखील खेळण्याची संधी मिळाली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Farmer Loan Waiver: साताऱ्यात ७,७८९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा, धक्कादायक कराण आल समाेर!

Nagpur Crime: डिजिटल अरेस्टचा आठ दिवसांचा सापळा! नागपुरातील ७५ वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याला २९ लाखांचा गंडा

माझ्यासाठी थांबू नकोस, मी आता... सचिन यांनी सांगितली लक्ष्मीकांत यांची 'नवरा माझा नवसाचा' दरम्यानची आठवण

समोर गोड बोलतात, पण मनात काही वेगळंच? चाणक्य नीती सांगते व्यक्ती ओळखण्याचे संकेत

Latest Marathi News Live Update : देऊळगाव रसाळमध्ये विहिरीच्या खोदकामावेळी दुर्घटना; दडी कोसळून दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT