Virat Kohli and Rohit Sharma 
क्रीडा

रोहित शर्मा अन् विराट कोहली प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला आले तरी का नाहीत? मोठे कारण समोर आले

Kiran Mahanavar

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवार 22 जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात देशभरातून हजारो मान्यवर सहभागी झाले होते. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली या दोघांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते, परंतु ते अयोध्येतील कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले.

अयोध्येत सोमवारी झालेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रात दिग्गज लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. क्रिकेटविश्वातून सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, एमएस धोनी, अनिल कुंबळे, व्यंकटेश प्रसाद, मिताली राज, रवींद्र जडेजा यांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, यापैकी फक्त सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, व्यंकटेश प्रसाद, मिताली राज, रवींद्र जडेजा इत्यादींनी कार्यक्रमात भाग घेतला.

या भव्य कार्यक्रमात रोहित शर्मा आणि विराट कोहली कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला की ते का अनुपस्थित होता. सोमवारीच बीसीसीआयने ट्विट केले होते की, विराट कोहली काही वैयक्तिक कारणांमुळे भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध होणार नाही.

अशा स्थितीत विराट अयोध्या कार्यक्रमातून या कारणास्तव गायब असल्याचे मानले जात आहे. रोहित शर्माने अयोध्येतील अभिषेक समारंभाला जाण्याऐवजी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सराव सत्राला उपस्थित राहण्यास प्राधान्य दिल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT