World Boxing Championship sakal
क्रीडा

World Boxing Championship : दीपक, हुसामुद्दीन, निशांतला ब्राँझपदक

भारतीय संघ पदकतालिकेत तीन पदकांसह चौथ्या स्थानावर राहिला. उझबेकीस्तानने ९ पदकांसह पहिले स्थान पटकावले.

सकाळ वृत्तसेवा

ताश्‍कंद - भारताच्या तिन्ही खेळाडूंना जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये ब्राँझपदक पटकावता आले. दीपक भोरिया, मोहम्मद हुसामुद्दीन व निशांत देव यांनी तिसरा क्रमांक पटकावला. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

पण भारतीय खेळाडूंच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकण्याच्या आशांवर पाणी फेरले गेले. भारतीय संघ पदकतालिकेत तीन पदकांसह चौथ्या स्थानावर राहिला. उझबेकीस्तानने ९ पदकांसह पहिले स्थान पटकावले. क्युबा व रशिया या देशांनी प्रत्येकी सहा पदकांवर मोहोर उमटवली. कझाकस्तानने ५ पदकांसह तिसरे स्थान मिळवले.

फ्रान्सच्या बिल्लाल बेन्नामा याने ५१ किलो वजनी गटात दीपकवर ४-३ असा विजय मिळवत अंतिम फेरीत वाटचाल केली. दीपकला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. हुसामुद्दीन याने दुखापतीमुळे उपांत्य फेरीच्या लढतीत न खेळण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूला पुढे चाल देण्यात आली. हुसामुद्दीनला ब्राँझपदक मिळाले. आशियाई विजेता कझाकस्तानचा अस्लानबेक शामबर्गेनोव याने ७१ किलो वजनी गटात निशांत या भारताच्या खेळाडूवर ५-२ असा विजय मिळवला आणि सुवर्णपदक पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली. निशांतला ब्राँझपदक मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT