Steve Smith Sakal
क्रीडा

Steve Smith : फलंदाजीचा क्रमांक बदलणे माझ्यासाठी धक्कादायक - स्टीव स्मिथ

ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथची नाराजी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध येत्या शनिवारी होणाऱ्या सामन्यासाठी ट्रॅव्हिस हेड याला फलंदाजीच्या क्रमवारीत सामावून घेण्यासाठी मला खालच्या क्रमांकावर खेळावे लागेल, असा संदेश माझ्यासाठी काहीसा धक्कादायक होता, अशी कबुली स्टीव स्मिथने दिली.

एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड हा महत्त्वाचा सामना शनिवारी होत आहे. दुखापतीमुळे आतापर्यंत संघाबाहेर राहिलेला हेड तंदुरुस्त झाला असून तो शनिवारी पहिल्यांदा या विश्वकरंडक स्पर्धेत खेळणार आहे.

स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा हुकमी फलंदाज असला तरी या विश्वकरंडक स्पर्धेत त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही; परंतु बुधवारी झालेल्या सामन्यात त्याने ६८ चेंडूंत ७१ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियासाठी तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा खेळाडू आहे.

ट्रॅव्हिस हेड मूळचा सलामीवीर आहे, तो संघात परतल्यावर सलामीला खेळेल. त्यामुळे डेव्हिड वॉर्नर किंवा मिचेल मार्श यापैकी एकाला तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागल्यास स्मिथला चौथा क्रमांक मिळेल.

तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येताना वेगळी मानसिकता तयार करावी लागते. ट्रॅव्हिस शनिवारच्या सामन्यात खेळला तर मला खालच्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागेल, असे मला कळवण्यात आले; असे स्मिथने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: आई, दार बंद करून माझ्यासोबत...; ६ वर्षांच्या चिमुकल्यासोबत विकृत कृत्य, संतापजनक घटनेनं खळबळ

विठ्ठलाशी काय आहे नातं? रिंकू राजगुरूच्या आयुष्यातील सर्वात हळवा भाग; आषाढी वारी निमित्त चाहत्यांना दिलं सरप्राईज

Latest Marathi News Live Update : एच. डी. कुमारस्वामी यांनी बिदादी टाउनशिप प्रकल्पाविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी एकता दर्शवली

Dodheshwar Road Row : दोधेश्वरात सात कोटींच्या अतिरिक्त रस्त्यावरून निधी उधळपट्टीचा आरोप; नैसर्गिक व धार्मिक वारसा धोक्यात?

IND vs ENG: ट्वेन्टी मालिका जिंकली आता वन डे! इंग्लंडने पहिल्या सामन्यासाठी जाहीर केली Playing XI

SCROLL FOR NEXT