World Cup Football  sakal
क्रीडा

World Cup Football : २०३४ मधील विश्‍वकरंडक फुटबॉल सौदी अरेबियात? यजमानपदातून ऑस्ट्रेलियाची माघार

याच सौदी अरेबियात २०२३ महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा झाली आणि त्याला दोन दशलक्ष

सकाळ वृत्तसेवा

सिडनी - २०३४ मधील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा सौदी अरेबियात होण्याची शक्यता आहे. यजमानपदाच्या शर्यतीतून ऑस्ट्रेलियाने माघार घेतल्यामुळे सौदी अरेबियाचा मार्ग मोकळा झाला आहे.

याच सौदी अरेबियात २०२३ महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा झाली आणि त्याला दोन दशलक्ष प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता त्यांना पुरुषांच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या यजमानपदाचे वेध लागले आहेत. आशिया फुटबॉल कॉन्फडरेशनने पाठिंबा दिल्यामुळे सौदी अरेबियाच्या दावेवादीला अधिक बळ मिळाले आहे.

२०३४ मधील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, परंतु सर्व बाबींचा विचार केल्यानंतर हे शक्य नसल्याचे जाणवले आणि त्यामुळे आम्ही यजमानपदाच्या शर्यतीतून माघार घेत आहोत, असे पत्रक फुटबॉल ऑस्ट्रेलियाकडून जाहीर करण्यात आले.

फिफाने यजमानपदासाठी रोटेशननुसार आशिया आणि ओशियाना खंडातून अर्ज मागवले होते. त्यानुसार सौदी आणि ऑस्ट्रेलिया यांनी शर्यतीत उडी मारली होती.

या विश्वकरंडक स्पर्धेच्या यजमानपदातून ऑस्ट्रेलियाने माघार घेतली असली, तरी २०२९ मधील क्लब विश्वकरंडक फुटबॉल आणि २०२६ मधील महिला आशिया करंडक स्पर्धेच्या यजमानपदासाठी प्रयत्न करणार आहे. महिला आशिया करंडक स्पर्धेसाठी सौदीने दावेदारी सांगितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णय? पाटीदार अम्पायरकडे धावला, विराट संतापला... वॉशिंग्टनला परत बोलवल्याने राडा

Jayakwadi dam drowning incident: जायकवाडी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू; एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू

IPL 2026 Final, RCB vs GT live: शुभमन-साई यांची विकेट अन् वैभव सूर्यवंशीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड... अहमदाबादमध्ये नोंदवला भन्नाट विक्रम

Vat Purnima 2026: अधिक मासामुळे वटपौर्णिमा उशिरा; जाणून घ्या योग्य तारिख, पूजेचा शुभ मुहूर्त आणि संपूर्ण विधी

Nagpur Drunken Drive Assault: ‘ड्रंकन ड्राईव्ह’ कारवाईवरून संतप्त युवकाचा पोलिस निरीक्षक व कर्मचाऱ्यांवर हल्ला; गिट्टीखदानात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT