Sift Kaur Samra sakal
क्रीडा

World Shooting Competition : सिफ्त कौर सामरा हिला ब्राँझपदक

सात पदकांसह भारत दुसऱ्या स्थानी

सकाळ वृत्तसेवा

भोपाळ : भारताच्या नेमबाजांनी येथील जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य व पाच ब्राँझ अशा एकूण ७ पदकांवर मोहोर उमटवली आणि पदकतालिकेत दुसरे स्थान पटकावले. सिफ्त कौर सामरा हिने महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात ब्राँझपदकाला गवसणी घातली. भारताचे हे या स्पर्धेतील सातवे पदक ठरले.

महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकाराच्या पात्रता फेरीमध्ये चीनच्या झँग कियॉनग्यूए हिने ५९४ गुणांसह पहिले स्थान पटकावले. भारताच्या सिफ्त हिने ५८८ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. झेक प्रजासत्ताकच्या ॲनेटा ब्रॅबकोवा हिने ५८६ गुणांसह सहावे स्थान पटकावले.

झँग - ॲनेटा यांच्यामध्ये सुवर्णपदकाची लढत रंगली. या लढतीत झॅंग हिने १६-८ असा विजय साकारला. झँगने सुवर्णपदकावर निशाणा साधला. ॲनेटाला रौप्यपदक मिळाले. सिफ्तने ब्राँझपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली.

चीन १२ पदकांसह पहिल्या स्थानी

चीनच्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या नेमबाजांनी ८ सुवर्ण, २ रौप्य व २ ब्राँझ अशी एकूण १२ पदके जिंकली. चीनने पदकतालिकेत पहिले स्थान कायम राखले. भारताने दुसरे स्थान पटकावले. जर्मनीने १ सुवर्ण, १ रौप्य व १ ब्राँझ अशी एकूण ३ पदके पटकावत तिसरे स्थान मिळवले.

जागतिक नेमबाजी स्‍पर्धा पदकतालिका

  • चीन - सुवर्ण ८, रौप्य २, ब्राँझ २ - एकूण १२

  • भारत - सुवर्ण १, रौप्य १, ब्राँझ ५ - एकूण ७

  • जर्मनी - सुवर्ण १, रौप्य १, ब्राँझ १ - एकूण ३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT