World Shooting Competition sakal
क्रीडा

World Shooting Competition : भारताच्या हझारिका, नॅन्सीला रौप्यपदक

हंगेरीच्या झालन पेकलर व हझारिका यांच्यामध्ये सुवर्णपदकाची लढत पार पडली. झालन याने २५२.४ गुणांची कमाई करीत सुवर्णपदक पटकावले. हझारिका याने २५१.९ गुणांची कमाई करीत रौप्यपदक जिंकले.

सकाळ वृत्तसेवा

बाकू (अझरबैझान) - भारताच्या नेमबाजांनी शुक्रवारी जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये आणखी दोन पदकांवर मोहोर उमटवली. माजी ज्युनियर विश्‍वविजेता हृदय हझारिका व हरयानाची नॅन्सी या भारतीय नेमबाजांनी अनुक्रमे पुरुषांच्या व महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदकाला गवसणी घातली.

हंगेरीच्या झालन पेकलर व हझारिका यांच्यामध्ये सुवर्णपदकाची लढत पार पडली. झालन याने २५२.४ गुणांची कमाई करीत सुवर्णपदक पटकावले. हझारिका याने २५१.९ गुणांची कमाई करीत रौप्यपदक जिंकले. नॅन्सीलाही सुवर्णपदक जिंकण्याची सुवर्णसंधी होती. तिच्याकडे ०.१ गुणांची आघाडी होती, पण चीनच्या हॅन जीयू हिने २५४ गुणांसह सुवर्णपदक नावावर केले. नॅन्सीला २५३.३ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Murli Manohar Joshi on Vishwaguru : "आपण आता ‘विश्वगुरु’ नाही!" भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला घरचा आहेर, राजकीय चर्चेला उधाण

IPL 2026 : पाजी, बरं झालं रिषभ पंतला तुम्ही घेतले! PBKS च्या चाहत्यांनी उडवली खिल्ली, Sanjiv Goenka यांचा चेहरा पडला... VIDEO

Latest Marathi News Live Update : TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीची तारीख जाहीर

राजा शिवाजी सिनेमात रितेशच्या धाकट्या लेकाने साकारलीये भूमिका ! ट्रेलरमध्ये दिसली झलक

Mumbai Water: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, ७ दिवस पाणीकपात होणार; कोणत्या भागांना फटका बसणार?

SCROLL FOR NEXT