World Test Championship 2023  Sakal
क्रीडा

WTC 2023 Standings : टीम इंडिया श्रीलंकेपेक्षा दुय्यम

इंग्लंड दौऱ्यापासूनच भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात केलीये.

सुशांत जाधव

पहिल्या कसोटी सामन्यात 187 धावांनी विजय मिळवत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या यादीत अव्वलस्थान मिळवले आहे.

World Test Championship 2023 standings after India and New Zealand Test draw : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅंम्पियनशिपच्या शर्यतीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंका संघ एका सामन्यातील विजयासह या क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. श्रीलंकेच्या खात्यात एकमेव विजयासह 12 गुण असून त्यांची विजयाचे प्रमाण शंभर टक्के आहे. श्रीलंका संघ वेस्ट इंडीज विरुद्ध घरच्या मैदानात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेनेच त्यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला सुरुवात केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात 187 धावांनी विजय मिळवत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या यादीत अव्वलस्थान मिळवले आहे.

श्रीलंकेपाठोपाठ या यादीत भारतीय संघाचा नंबर लागतो. इंग्लंड दौऱ्यापासूनच भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात केली. भारतीय संघाने दोन विजय आणि दोन सामने अनिर्णित राखले असून एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खात्यात 30 गुण जमा असून त्यांचे विनिंग पर्सेंटेज 50 आहे. त्यापाठोपाठ 1 विजय आणि एका पराभवासह पाकिस्तानचा संघ 50 विनिंग पर्सेंटेजसह तिसऱ्या स्थानावर आहे.

वेस्ट इंडीजचा संघ एक विजय आणि दोन पराभवासह 12 गुण आणि 33.33 विनिंग पर्सेंटेजसह चौथ्या स्थानावर आहे. पहिली वहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या न्यूझीलंडच्या खात्यात एका ड्रॉसह 4 गुण जमा असून 33.33 विनिंग पर्सेंटेजसह ते पाचव्या स्थानावर आहेत. इंग्लंडचा संघ एक विजय आणि दोन सामन्यातील पराभवासह 14 गुण आणि 29.17 विनिंग पर्सेंटेजसह सहाव्या स्थानावर आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Crisis: मोजतबा खामेनींना सत्तापालटाची भीती! इराणमध्ये कठोर नियम लागू; अमेरिका-इस्त्रायलवर गंभीर आरोप

IND vs AFG: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! विराट कोहली मालिकेबाहेर? 'हा' खेळाडू घेणार जागा!

संजू राठोडच्या 'गुलाबी साडी' गाण्यासाठी अभिनेत्रीला किती पैसे मिळाले? प्राजक्ता म्हणाली, 'चांगला मित्र म्हणून त्याने...'

NEET 2026 री-एग्झामचा सुद्धा पेपर झाला लीक? टेलिग्रामवरील दाव्यांची NTA कडून सायबर क्राइमकडे चौकशी

Nagpur News : पुन्हा ‘नीट’ परीक्षा देण्याची हिम्मत नाही; विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, सुसाइड नोटमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT