Wrestler Protest Suspends  esakal
क्रीडा

Wrestler Protest Suspends : क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत बैठक अन् कुस्तीपटूंनी आंदोलन केले स्थगित

अनिरुद्ध संकपाळ

Wrestler Protest Suspends : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करत पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले होते. आता हे आंदोलन 15 जूनपर्यंत स्थगित केलं असल्याची माहिती कुस्तीपटू बजरंग पुनियाने दिली. हा निर्णय केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर घेण्यात आला.

बजरंग पुनिया बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 'आम्ही या बैठकीत काही मुद्द्यावर चर्चा केली. पोलीसांची चौकशी ही 15 जूनपर्यंत पूर्ण होईल. क्रीडा मंत्र्यांनी आम्हाला विनंती केली की तोपर्यंत तुम्ही तुमचे आंदोलन स्थगित करा.'

बजरंग पुढे म्हणाला की, 'क्रीडा मंत्र्यांनी महिला कुस्तीपटूंच्या सुरक्षेची देखील काळजी घेतली जाईल असे सांगितले. आम्ही त्यांच्याकडे कुस्तीपटूंविरूद्ध दाखल केलेल्या सगळ्या एफआयआर मागे घेण्याची देखील मागणी केली आहे. त्यांनी हे मान्य केले आहे.'

दरम्यान कुस्तीपटू आणि त्यांच्या प्रशिक्षकांची शनिवारी (3 जून) रोजी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये गृहमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्याचंही यावेळी बोलताना बजरंग पुनिया याने सांगितले होते. याचबरोबर सर्व कुस्तीपटू नोकरीवर परतले होते.

कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या शेतकरी संघटना आणि खाप पंचायत यांनी देखील सबुरीचा पवित्रा घेतला. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देखील 9 जून रोजी होणारी महापंचायत कुस्तीपटूंच्या विनंतीवरून पुढे ढकलले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

Karnataka Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 1.50 टक्क्यांची वाढ; 'या' तारखेपासून लागू होणार नवे वेतन

Latest Marathi News Live Update : नीट प्रकरणातील संशयित शुभम खैरनारची सीबीआयकडून चौकशी सुरू, दिल्लीला नेण्याची शक्यता

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SCROLL FOR NEXT