Rohit Sharma DRS Video WTC Final esakal
क्रीडा

Rohit Sharma WTC Final : घेतो घेतो म्हणत हात झटकले.... रोहितनं पंचांनाच गंडवलं; Video व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma DRS Video WTC Final : भारताचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या WTC Final मध्ये दुसऱ्या दिवशी चांगले बॉलिंग चेंजेस करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 469 धावात संपुष्टात आणला. भारतीय गोंलंदाजांनी पहिल्याच सत्रात कांगारूंच्या फलंदाजीला भगदाड पाडण्यास सुरूवात केली. पहिल्या दिवशी भडकलेल्या मूडमध्ये असलेला रोहित शर्मा दुसऱ्या दिवशी चांगल्या कामगिरीमुळे हसमूख भाई बनला होता. त्याने याच मूडमध्ये अंपायरची देखील मज्जा केली.

रोहित शर्मा DRS घेताना कायम एका वेगळ्याच मूडमध्ये असतो. मात्र आज ओव्हलवर रोहितने DRS घेताना एक प्रँक केला. सामन्याच्या 97 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद शमीने अॅलेक्स कॅरीविरूद्ध पायचीतची जोरदार अपिल केली. अंपायरने ही अपिल फेटाळली. या अपिलनंतर भारतीय संघातील सर्व खेळाडू एकत्र जमले.

रोहितने डीआरएससाठी विकेटकिपर केएस भरतला विचारणा केली. त्यानंतर रोहितने आपण DRS घेण्याची फक्त अॅक्शन करत पंचांना गोंधळात टाकले. रोहितने DRS घेण्याचे हातवारे केले. मात्र आपली अॅक्शन पूर्ण केली नाही.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 469 धावात संपुष्टात आणला. भारताकडून मोहम्मद सिराजने 4 तर मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजाने 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने 163, स्टीव्ह स्मिथने 121 धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर अॅलेक्स कॅरीने 48 आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 43 धावांचे योगदान दिले.

भारताने आपला पहिला डाव सुरू केला त्यावेळी चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र पॅट कमिन्सने रोहितला 15 तर बोलँडने शुभमन गिलला 12 धावांवर बाद करत भारताला पाठोपाठ दोन धक्के दिले. चहापानासाठी खेळ थांबला त्यावेळी भारताच्या 2 बाद 37 धावा झाल्या होत्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT