mother daughter.jpg 
लाइफस्टाइल

सावत्र आईने कधीही करुन नयेत 'या' तीन गोष्टी; नाहीतर...

चांगली आई व्हायचंय?; मग 'या' गोष्टींच्या घ्या काळजी

शर्वरी जोशी

'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी', असं म्हणत कायम आईच्या प्रेमाची महती सांगण्यात येते. या वाक्यावरुनच आई प्रत्येकासाठी किती महत्त्वाची आहे हे दिसून येतं. मन मोकळं करण्याची आपल्या हक्काची जागा म्हणजे आईची कूस. त्यामुळे आई या शब्दाचं, व्यक्तीचं असं मोजक्या भाषेत वर्णन करता येणार नाही. परंतु, काहींच्या वाट्याला आईचं सुख फार काळ नसतं. त्यामुळे आईविना पोरकी झालेली मुलं कायम इतर स्त्रियांमध्येच आपल्या आईला शोधत असतात. म्हणूनच, आपल्या मुलांचं संगोपन नीट व्हावं, त्यांना आईचं प्रेम मिळावं यासाठी पुरुष दुसरं लग्न करतात. मात्र, समाजात दुसऱ्या आईला 'सावत्र आई' stepmom असा टॅग लावून, ती किती वाईट असते हेच लहान मुलांच्या मनावर बिंबवलं जातं. त्यामुळे तुम्ही मुलांसोबत कितीही चांगलं वागलात तरी त्यांच्या मनात तुमच्याविषयी गैरसमज आधीच निर्माण झालेला असतो. याच कारणास्तव दुसरी आई किंवा सावत्र आई stepmom होणं वाटतं तितकं सोपं नाही. म्हणूनच, सावत्र आईने नेमक्या कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे ते जाणून घेऊयात. (3-parenting-mistakes-to-avoid-if-you-are-a-stepmom)

१. अतिउत्साहीपणा टाळा -

एक चांगली आणि आदर्श आई होण्याचा निर्धार करणं निश्चितच चांगली गोष्ट आहे. मात्र, त्यासाठी उतावळेपणा किंवा अतिउत्साहीपणा दाखवण्याची गरज नाही. कारण, गोष्टी बदलायला वेळ लागतो. लगेच कोणताही बदल होत नाही. मुळात आईचं अचानक सोडू जाणं लहान मुलांसाठी मोठा आघात असतो. त्यामुळे लगेच ते तुमचा आई म्हणून स्वीकार करणार नाहीत. त्यांना वेळ द्या. त्यांच्या कलाकलाने वागा. अनेकदा ते तुमच्यावर चिडतील, ओरडतील किंवा तुमचं काही ऐकणार नाहीत. पण, त्यावेळी त्यांच्यावर रागावण्यापेक्षा त्यांची मन:स्थिती समजून घ्या. तुम्ही जितका वेळ त्यांना द्याल आणि त्यांच्याशी मैत्री कराल. तितक्या लवकर त्यांची तुमच्याशी मैत्री होईल.

२. सतत मागे लागू नका -

अनेक स्त्रिया मुलांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे बऱ्याचदा मुलं आणि सावत्र आई यांच्यात खटके उडल्याचं पाहायला मिळतं. जर मुलं वयात येत असतील तर त्यांना त्यांची पर्सनल स्पेस द्या. जर तुम्ही सतत त्यांना प्रश्न विचारत बसलात तर ते चिडू शकतात. परिणामी, तुमच्या नात्यातील दरी अधिक खोल होऊ शकते. त्यामुळे त्यांच्याशी मैत्री करायचा प्रयत्न करा आणि त्या मैत्रीच्या माध्यमातून काय योग्य, काय अयोग्य हे समजवा.

३. मुलांकडे दुर्लक्ष करुन नका -

लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्रिला तिच्या नवऱ्यासोबत क्वालिटी टाइम्स घालवण्याची इच्छा असते. मात्र, तुमच्या लग्नाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत याची जाणीव ठेवा. पतीसोबत वेळ घालवायचाय म्हणून मुलांकडे दुर्लक्ष करणं किंवा मुलांपासून नवऱ्याला दूर ठेवणं अशा गोष्टी करु नका. जर तुम्ही असं करत असाल तर एक आदर्श किंवा चांगली आई कधीच होऊ शकत नाही. मुलांविषयी मनात कधीच इर्षा ठेऊ नका. तुम्ही जितकं मुलांवर प्रेम कराल तितकंच प्रेम तुम्हाला मुलं आणि पतीकडून मिळेल हे लक्षात ठेवा. प्रेमाने गोष्टी जिंकायला शिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: एकमेकांवरील हल्ले अजूनही सुरूच; मृतांची संख्या चौदाशेहून अधिक, इराणमध्ये मोठे नुकसान

Jyoti Waghmare : राज्यसभेवर जाणाऱ्या ज्योती वाघमारे ठरल्या सोलापूर जिल्ह्यातील तिसऱ्या नेत्या; यापूर्वी कोणाला मिळाली होती संधी? एकनाथ शिंदेंचा 'मास्टरस्ट्रोक' चर्चेत!

Missile Attack Crude Oil Tanker : इस्त्राईल-इराण युद्धात क्रूड ऑईल जहाजावर क्षेपणास्त्र हल्‍ला, कोल्हापूरचा रोहित पाटील जहाजात; अनेकांना बहरीनमध्ये हलवलं

IND vs NZ Final: ७ सामन्यांत १२.७१ ची सरासरी अन् ८९ धावा! अभिषेक शर्मा OUT, रिंकू सिंग IN? वर्ल्ड कप फायनलसाठी भारताच्या Playing XI मध्ये दोन बदल अपेक्षित

Sukhoi Fighter Jet Crash : 'Purvesh Is No More..'! कॅप्टनचे ते शब्द ऐकताच पूर्वेशच्या वडिलांवर मोठा आघात; म्हणाले, 'छत्रपती शिवरायांचा त्याच्यावर..'

SCROLL FOR NEXT