Anant-Radhika Wedding  esakal
लाइफस्टाइल

Anant-Radhika Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नात उपस्थित पाहूण्यांची चांदी, रिटर्न गिफ्ट म्हणून दिली दोन कोटींची घड्याळे

Anant-Radhika Wedding Returns Gift : श्रीमंताच्या घरचा आहेर, दोन कोटींच्या वर किंमत असलेल्या घड्याळांचा पाहुण्यांना केला आहेर

सकाळ डिजिटल टीम

Anant-Radhika Wedding :

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अनेक बॉलीवूड स्टार्स आणि स्पोर्ट्स सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाला देश-विदेशातून पाहुणे आले होते. मुकेश अंबानी यांनी लग्नात व्हीव्हीआयपी पाहुण्यांवर करोडो रुपये खर्च केले होते. लग्नात खास व्यवस्था पाहायला मिळाली.

शाहरुख खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर, आलिया भट्ट, क्रिती सेनॉन, अनन्या पांडे, शनाया कपूर, ऐश्वर्या राय, वरुण धवन, रजनीकांत, अनिल कपूर आणि निक जोनास यांसारख्या स्टार्सनी प्रियांका चोप्रासह लग्नाला हजेरी लावली होती. (Anant-Radhika Wedding Returns Gift)

रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा यांच्या नृत्याविष्काराने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्याचवेळी रजनीकांतनेही रणवीरसोबत 'गल्ला गुडियां' गाण्यावर डान्स करून सर्वांना चकित केले.

अनंत राधिकाच्या लग्नात पाहुणे मंडळींची रेलचेल होती. त्यांना अनेक व्हरायटी असलेले पदार्थ तर खायला मिळालेच. पण, त्याचसोबत वर पक्षाकडून असलेल्या पाहुण्यांना खास कपडे देण्यात आले होते. वराच्या मित्रांना कोट्यावधींची रिटर्न गिफ्ट देण्यात आली आहेत. अनंत राधिकाच्या लग्नाचा एकूण खर्च 5000 कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते

मुकेश अंबानींनी आपल्या मुलाच्या लग्नावर खूप खर्च केला आहे, पण मुलगा अनंत अंबानीनेही आपल्या मित्रांना रिटर्न गिफ्ट्सवर करोडो रुपये खर्च केले आहेत. होय, राधिका अनंतचे १२ जुलै रोजी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्न झाले. यावेळी अनंतचे अनेक खास मित्र आणि जवळचे लोक आले होते. या खास प्रसंगासाठी अनंतने खास मित्रांना महागडी घड्याळे भेट दिली आहेत.

शिखर पहाडिया, वीर पहाडिया, मीझान जाफरी, शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंग यांच्यासह अनेक मित्रांना 18 कॅरेटचे रोझ गोल्डचे ऑडेमार्स पिगेट (Audemars Piguet Watches) घड्याळ भेट देण्यात आले आहे. या घड्याळात वर्ष, महिना, खगोलीय चंद्र, दिवस आणि तारखेसह संपूर्ण कॅलेंडर आहे.

हे घड्याळ 18 कॅरेट सोन्याचे, एपी फोल्डिंग बकल आणि निळ्या मोहक बेल्टसह येते. या घड्याळाची किंमत 1.67 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अनंतच्या लग्नात त्याचे मित्र खास कपडे घातलेले दिसले होते ज्यावर त्यांनी DDC लिहिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Ahir: सचिन अहिरांच्या घरात २.६० कोटींची चोरी, ५ वर्षांत टप्प्याटप्प्याने मारला डल्ला; प्रकरण कसे आले उघडकीस?

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ची पातळी वाढणार; नाशिकला गोदेला महापूर, ‘नांदूर मधमेश्वर’मधून मोठा विसर्ग

Latest Marathi News Live Update : जंतरमंतर इंटरनेट बंदीप्रकरणी दिल्ली हायकोर्टाची तातडीची सुनावणी; सरकारच्या निर्णयाला आव्हान

प्राजक्ता माळीनं केलंय किंग खानसोबत काम! एका सीनसाठी घेतलेले 17 टेक; SRKसोबतची जुनी क्लिप व्हायरल

IND vs ZIM T20I Schedule: वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात चमकला... आता भारत-झिम्बाब्वे यांच्यातला पुढील सामना केव्हा?

SCROLL FOR NEXT