Winter Skin Care esakal
लाइफस्टाइल

Winter Skin Care : चेहऱ्यावर हवा आहे गुलाबी ग्लो? मग, सफरचंदापासून बनवा 'हे' फेसपॅक्स

सफरचंद हे आरोग्यासााठी आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Winter Skin Care : थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच त्वचेची देखील खास काळजी घ्यावी लागते. वातावरणातील बदलामुळे त्वचा आणि केस अधिक कोरडे होऊ लागतात. त्वचा अधिक कोरडी झाल्यामुळे त्वचेच्या इतर समस्या निर्माण होतात.

हिवाळ्यात त्वचेवर रॅशेस येणे, सुरकुत्या दिसणे, त्वचा फाटणे, त्वचेला तडे जाणे, इत्यादी समस्या निर्माण होतात. या समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या लोशन्स, मॉईश्चरायझर्सचा त्वचेवर वापर करतो. मात्र, त्याने तात्पुरता फरक पडतो. या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही सफरचंदाची देखील मदत घेऊ शकता.

सफरचंद हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. परंतु, आरोग्यासोबत सफरचंद हे त्वचेसाठी देखील तितकेच फायदेशीर आहे. आज आपण त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी लाभदायी असलेल्या सफरचंदाच्या फेसपॅक्सबद्दल जाणून घेणार आहोत.

सफरचंद आणि दही

हा फेस पॅक तुमची त्वचा खोलवर स्वच्छ करण्याचे काम करेल. हा फेस पॅक तयार करण्यासाठी तुम्हाला सफरचंद, दही आणि लिंबाचा रस लागेल. आता सर्वात आधी सफरचंद मिक्सरला बारीक करून घ्या.

आता या सफरचंदाच्या पेस्टमध्ये २-३ चमचे दही मिसळा. त्यानंतर, त्यात लिंबाचा रस मिसळा. आता हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करून चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.

सफरचंद आणि मध

मधामुळे आपल्या त्वचेवर ग्लो येण्यास मदत होते. सफरचंद आणि मधाचा हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळेल आणि पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होईल.

हा फेस पॅक बनवण्यासाठी सफरचंदाची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्या. आता, या पेस्टमध्ये १ चमचा मध आणि १ चमचा हळद मिसळा.

तुम्हाला हवे असल्यास त्यात तुम्ही गुलाबजल मिसळू शकता. आता हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करा आणि चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT