palazzo 
लाइफस्टाइल

फॅशन टशन - पलाझोसोबत हटके स्टाईल

माधुरी सरवणकर-तेलवणे

तुमच्यासाठी फॅशन म्हणजे काय आहे, असा प्रश्‍न कोणी विचारल्यास त्याचं उत्तर नक्कीच ‘कंफर्ट’ असेल, यात काही शंका नाही. सध्या कंफरटेबल पॅन्ट पॅर्टनमधील एक चांगला पर्याय म्हणजे ‘पलाझो’. खूप कमी वेळात हा पॅर्टन मुलींमध्ये लोकप्रिय झाला आहे. त्यामुळं प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये त्याच्या असंख्य व्हरायटी दिसतील. पलाझोवर विविध प्रकारचे ट्रेन्डी टॉप घालून एक कम्फरटेबल स्टाईल करता येते बरं का!

सध्या पलाझो ट्रेन्डमध्ये आहे. सैलसर असलेला हा पॅन्ट पॅर्टन तुम्ही ऑफिस, कॉलेज किंवा एखाद्या कार्यक्रमात वापरू शकता. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसांसाठी हा पर्याय उत्तम आहे. तुम्हाला असं वाटत असेल की, पलाझो फक्त कुर्त्यासोबतच घालता येतो तर तसं नाहीये. तुमच्याकडं उपलब्ध असलेल्या पलाझोसोबत तुम्ही काहीही घालू शकता. तुमचा लुक फेल होणार नाही हे नक्की!  ऑफ शोल्डर टॉप, क्रॉप टॉप, सॅण्डो, ट्यूब टॉप यावर कडक दिसतात.

मात्र, पलाझो निवडताना प्लिटेड, फ्लेअर्ड, स्ट्रेट कटची निवडा. दीपिका पदुकोणने एका इव्हेंटसाठी ऑफ शोल्डर टॉप आणि क्रॉप्ड पलाझो हा लुक निवडला होता. तुम्ही फ्लेअर्ड पलाझोवर फॉर्मल जॅकेटदेखील घालू शकता. हा लुक ऑफिससाठी अगदी परफेक्ट आहे. यावर तुम्ही हिल्स घालू शकता. यामुळे तुम्ही अधिक कूल दिसाल. तसेच, ॲक्लेसरीज निवडताना डीप नेकचा टॉप असल्यास गळ्यात चेन घाला व कानात हॅंगिंग इअरिंग्स घालायला विसरू नका. 

अशी करा स्टाईल -
  • उन्हाळ्यात पलाझोचं फॅबरिक निवडताना कॉटनला प्राधान्य द्या.
  • लांबीला शॉर्ट असलेले व कंबरेजवळ नॉट असलेले पलाझो भारी दिसतात.
  • प्रिंटेड पलाझोवर तुम्ही प्लेन सॅण्डो टॉप घालू शकता.
  • त्यावर हाय बन व ऍक्‍ससरीजमध्ये स्टेटमेंट नेकलेस किंवा चेन ट्राय करू शकता. हा लूक एखाद्या डिनर पार्टीसाठी उत्तम आहे.
  • फुटवेअर निवडताना हिल्स किंवा स्निकर्सचा नक्कीच विचार करा. इंडो वेस्टर्न लुकसाठी मोजडी किंवा कोल्हापुरी छान दिसेल.
  • लाईट मेकअप केल्यास तुमचा लुक आणखी छान दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT