लाइफस्टाइल

Virat Kohli Son : विराट-अनुष्काच्या बाळाची चक्क ८ वर्षांपूर्वी केली होती भविष्यवाणी! काय म्हणतात अयोध्येचे ज्योतिषी?

विराट-अनुष्काच्या बाळाची चक्क ८ वर्षांपूर्वी केली होती भविष्यवाणी

Aishwarya Musale

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा  यांना 15 फेब्रुवारी 2024 रोजी पुत्ररत्न प्राप्त झालं आहे.  बाळाच्या जन्माच्या पाच दिवसांनी 20 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली.

अनुष्काची डिलिव्हरी भारतात नाही तर विदेशात झाली आहे. विराट-अनुष्काने आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देण्यासाठी भारतामधील एखादे शहर नाही तर लंडन निवडलं. विराट आणि अनुष्काने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले.

अनेकांना असे वाटत होते, की एकट्या एबी डिव्हिलियर्सनेच याबाबत माहिती दिली आहे, पण असे नाही आणखी एका व्यक्तीने याबाबत काही वर्षांपूर्वी ही माहिती दिली होती.

बरं, हा दुसरा कोणी नसून ज्योतिषी होता ज्याने सुमारे आठ वर्षांपूर्वी फेसबुक पोस्टद्वारे 2021 ते 2024 दरम्यान कोहलीच्या दुसऱ्या मुलाच्या आगमनाची भविष्यवाणी केली होती. 2 एप्रिल 2016 पासून, FB पेज 'स्टार्स अँड अ‍ॅस्ट्रोलॉजी' ने कोहलीच्या जन्मकुंडलीचे तपशीलवार वर्णन तयार केले आहे. या पेजवरुन विराट कोहलीची कारकीर्द, अनुष्कासोबत त्याचं लग्न आणि इतर बऱ्याच गोष्टींबाबत अचूक 'अंदाज' व्यक्त केले होते.

विशेष म्हणजे 2021 ते 2025 या कालावधीमध्ये विराट कोहलीचा फॉर्म कधी-कसा असेल याबाबत देखील यामध्ये भविष्यवाणी करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार हे अंदाज खरे देखील ठरले आहेत. कोहली मार्च 2028 पूर्वी निवृत्त होणार असल्याची भविष्यवाणी देखील यात करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर चाहते विराट आणि अनुष्काचे अभिनंदन करत आहेत. पण विराट आणि अनुष्काच्या घरी छोटा पाहुणा आला तो दिवस कसा होता हे तुम्हाला माहीत आहे का? ग्रह आणि नक्षत्राची स्थिती काय होती? त्या दिवसाचा प्रभाव काय आहे?

ज्योतिष शास्त्रात ग्रह, नक्षत्र आणि जन्मकुंडली यांचे खूप महत्त्व मानले जाते. सनातन धर्मात जेव्हा एखाद्याचा जन्म होतो, तेव्हा लग्न मुहूर्त आणि ग्रह नक्षत्राची स्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ज्योतिषांच्या मते १५ फेब्रुवारी हा दिवस अतिशय शुभ होता आणि या दिवशी अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला.

अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी सांगितले की, "15 तारखेला शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी होती. हा दिवस गुरुवार होता आणि या दिवशी नक्षत्राचा स्वामी शुक्र आणि राशीचा स्वामी मंगळ होता. अशा परिस्थितीत या दिवशी जन्मलेली मुले खूप रहस्यमय आणि भाग्यवान मानली जातात."

अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, "अनुष्का शर्माचा मुलगा खूप हुशार असेल. आपल्या बुद्धिमत्तेने आणि विवेकाने विरोधकांचा पराभव करेल. देशाचं नाव मोठं करेल. हे मूल विराट कोहलीच्यानंतर देशाला प्रसिद्धी मिळवून देईल."

'अकाय' नावाचा अर्थ

विराट-अनुष्काने त्यांच्या मुलाचे नाव 'अकाय' असे ठेवले आहे. विराट-अनुष्काने 'अकाय' हे नाव खूप विचार करुन ठेवलं आहे. हिंदी शब्दकोशानुसार, 'अकाय' म्हणजे 'निराकार'. कोणताही आकार, रूप नसलेल्याला निराकार म्हटलं जातं. तसेच 'अकाय'चा एक अर्थ चंद्राचा प्रकाश असाही होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच इंधनाचे नवे दर! मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल कितीला?

Akola Accident: भीषण अपघातात दाम्पत्याचा अंत; अमरावतीहून मूर्तिजापूरकडे जाताना काळाचा घाला ; तिघेही गंभीर

‘Toxic’च्या इव्हेंटमध्ये मोठा अपघात! स्पीकर स्टँड कोसळला, ४ जण जखमी; यशने थांबवलं भाषण

Marathi News Live Updates : घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात कचऱ्यावर उभं राहून मनसेचं आंदोलन

Bhuleshwar Ganesh Idol Collapse Video : भुलेश्वरमध्ये गणेशमूर्ती कोसळल्याचा VIDEO समोर; मंडळाच्या अध्यक्षांसह दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT