Benefits of Marigold  esakal
लाइफस्टाइल

Benefits of Marigold: केसांच्या समस्यांमुळे हैराण आहात? झेंडू आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ फायदे

झेंडूमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळतो.

सकाळ डिजिटल टीम

दाट केसांसाठी आणि केसांच्या चांगल्या वाढीसाठी आपण अनेक उपायांचा अवलंब करतो. त्यामध्ये मग महागडे शॅंम्पू, हेअर सीरम्स, कंडिशनर्स महागड्या हेअर ट्रीटमेंट्स असं बरच काही आपण करतो. या सर्व प्रॉडक्ट्समध्ये भरपूर प्रमाणात रासायिनक घटक असतात.

हे रासायनिक घटक आपल्या केसांना तात्पुरता फरक देतात. परंतु, नंतर आपले केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. एवढचं काय तर केसांच्या इतर समस्या देखील सुरू होतात. या समस्या दूर करण्यासाठी आणि केसांची योग्य काळजी घेण्यासाठी आपण नैसर्गिक आणि काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकतो.

झेंडूमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळतो. हे पोषकघटक आपल्या केसांसाठी अतिशय फायदेशीर आहेत. झेंडूमुळे आपल्या केसांच्या समस्या दूर होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात केसांसाठी झेंडूचे फायदे.

केसांसाठी झेंडूचे फायदे कोणते ?

कोंड्यापासून मिळेल मुक्ती

केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या आजकाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोंड्याची ही समस्या झेंडूच्या फुलामुळे दूर होऊ शकते. झेंडूच्या फुलाचा उपाय करण्यासाठी काही झेंडूची फुले घ्या.

या फुलांच्या पाकळ्या दोन कप गरम पाण्यात उकळून घ्या. त्यामध्ये कडुलिंबाचे तेल मिक्स करा. आता हे सगळे मिश्रण एकत्र करून एका बॉटलमध्ये भरा. आता याचा स्प्रे टाळूवर आणि केसांवर करा. तुमची कोंड्याची समस्या काही दिवसांमध्ये दूर होण्यास मदत होईल.

केसगळती रोखण्यास लाभदायी

केसगळतीची समस्या आजकाल सर्वांना भेडसावत आहे. पुरूष आणि महिलांमध्ये केसगळतीचे प्रमाण वाढले आहे. ही समस्या रोखण्यासाठी झेंडूचे फुल फायदेशीर आहे.

केसगळतीवर झेंडूचा उपाय करण्यासाठी २-३ झेंडूची फुले १ कप पाण्यात टाकून ते पाणी उकळून घ्या. हे पाणी आता थंड झाल्यावर त्याचा वापर केस धुण्यासाठी करा. आठवड्यातून किमान २ वेळा हा उपाय करा. पुढील काही दिवसांमध्ये तुमची केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकेल.

हेल्दी केसांसाठी फायदेशीर

केस हेल्दी रहावेत यासाठी आपण नाना प्रकारचे उपाय करतो. हेल्दी केसांसाठी केसांची योग्य काळजी घेणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. झेंडूची फुले केस हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात.

हेल्दी केसांसाठी झेंडूची २-३ फुले घ्या. या फुलांच्या पाकळ्या खोबरेल तेलासोबत उकळून घ्या. यामध्ये तुम्ही कापूर देखील घालू शकता. त्यानंतर हे तेल टाळू आणि केसांवर लावा. यामुळे तुमचे, केस हेल्दी राहतील आणि मजबूत होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT