Rosemary Oil for Hairs esakal
लाइफस्टाइल

Rosemary Oil for Hairs : लांब आणि घनदाट केसांसाठी फायदेशीर आहे रोझमेरी ऑईल, जाणून घ्या ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रोझमेरी ऑईल हे केसांसाठी अतिशय लाभदायी आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Rosemary Oil for Hairs : रोझमेरी ऑईल हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे तेल रोझमेरी वनस्पतीच्या पानांपासून तयार केले जाते. या पानांवर स्टीम डिस्टिलेशनची प्रक्रिया करून हे तेल काढले जाते. या तेलाचा सुगंध अतिशय सुंदर आहे.

आरोग्यासोबतच केसांसाठी देखील या तेलाचा आवर्जून वापर केला जातो. शॅंम्पू, कंडिशनर आणि हेअर ऑईलच्या रूपात या तेलाचा वापर केला जातो. हे तेल केसांसाठी अतिशय लाभदायी आहे.

या तेलामुळे केसांचे छान पोषण होते आणि केस मजबूत होण्यास मदत होते. आज आपण केसांसाठी फायदेशीर असलेल्या रोझमेरी तेलाचे फायदे जाणून घेणार आहोत.

रोझमेरी तेल केसांना लावण्याचे फायदे कोणते ?

पांढऱ्या केसांची समस्या दूर होते

अकाली पांढरे केस होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे पांढरे केस लपवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र, तुम्हाला या समस्येपासून आराम मिळवून देण्याचे काम रोझमेरीचे तेल करते.

रोझमेरीचे तेल नियमितपणे केसांना लावल्याने केसांच्या इतर समस्या आणि केस अकाली पांढरे होण्याची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकेल. त्यामुळे, या रोझमेरी ऑईलचा अवश्य वापर करा.

केसांच्या वाढीसाठी फायदेशीर

रोझमेरी ऑईलमध्ये पोषकतत्वांचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, हे तेल केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये आढळून येणाऱ्या अँटीफंगल गुणधर्मांमुळे केसांचा टाळू निरोगी राहण्यास मदत होते.

हे रोझमेरी ऑईल इतर तेलांमध्ये मिसळून लावल्यास केसांना छान चमक येते. शिवाय, केसांची वाढ होण्यासाठी हे तेल फायदेशीर आहे.

फाटे फुटलेल्या केसांपासून सुटका होते

फाटे फुटलेले केस अजिबात चांगले दिसत नाही. अशा केसांमुळे मग केस खराब दिसू लागतात. जर तुमच्या केसांमध्ये फाटे फुटण्याची समस्या असेल तर, रोझमेरी ऑईल या समस्येपासून तुमची सुटका करू शकेल.

फाटे फुटलेल्या केसांपासून सुटका करून घेण्यासाठी आणि केसांच्या मजबूतीसाठी रोझमेरी ऑईल अतिशय लाभदायी आहे. तुम्ही या तेलाचा वापर करून केसांची मजबूती वाढवू शकता आणि फाटे फुटलेल्या केसांपासून सुटका करून घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT