kitchen sakal
लाइफस्टाइल

Safety In Kitchen: मुलांसोबत स्वयंपाक करत असाल तर या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं, नाहीतर...

मुलांसोबत स्वयंपाक करण्यासाठी किंवा स्वयंपाकघरात वेळ घालवण्यासाठी काही नियम फाॅलो करणे फार महत्वाचे आहे.

Aishwarya Musale

अनेक लोक आपल्या सुट्टीचा वेळ त्यांच्या मुलांसोबत घालवतात. वेळ घालवण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजेच मुलांना तुमच्या कामाचा भाग बनवणे. असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या मुलांना स्वयंपाकाचा एक भाग बनवतात म्हणजेच मुलांना सोबत घेऊन स्वयंपाक बनवतात.

लहान मुले सहसा स्वयंपाकघरातील अ‍ॅक्टिव्हिटीचा आनंद घेतात. मुलांनी स्वयंपाकघरात येऊ नये असे नाही, पण पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा मुलांसाठी धोका निर्माण होऊ शकतो.

स्वयंपाकघरात अशी खबरदारी घ्या

स्टोव्ह उंच ठिकाणी ठेवा

तुम्ही ज्या स्टोव्हवर जेवण बनवत आहात तो मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा, लहान मुलांचा जर हात स्टोव्हपर्यंत पोहोचला तर ते धोकादायक आहे. तसेच आजूबाजूला कुठलाही स्टूल किंवा अशी कोणतीही वस्तू ठेऊ नका जिच्यावर चढून तो स्टोव्हपर्यंत पोहोचू शकेल. असे केल्याने बर्न होण्याचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होईल.

स्वच्छतेची काळजी घ्या

किचनमध्ये अनेकदा घाण किंवा तेल किचन कट्ट्यावर चिकटून राहते आणि लहान मुलांना तिथे आणणे योग्य नाही. कारण तिथल्या घाणेरड्या वस्तूंना स्पर्श केल्यास मुलं आजारी देखील पडू शकतात. म्हणूनच स्वयंपाकघर रोज स्वच्छ करा आणि तेथील डस्टबिन बॉक्स बंद करा.

मुलाला कधीही एकटे सोडू नका

मुलांना कधीही किचनमध्ये एकटे जाऊन देऊ नका. एकतर मुलांना घरातील इतर व्यक्तीकडे द्या किंवा स्वयंपाकघरातून बाहेर जाण्यास सांगा. त्यानंतर स्वयंपाकघरचे दार बंद करा. ज्यामुळे किचनमधील वस्तूंना लहान मुलं हात लावू नाही शकणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT