Skin Care Tips esakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips : त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी असा करा काकडीचा वापर, बनवा ‘हे’ फेसपॅक

काकडी ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा समावेश असतो.

Monika Lonkar –Kumbhar

Skin Care Tips : काकडी ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा समावेश असतो.

काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी देखील असते. त्यामुळे, आपले शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि त्वचेला हेल्दी ठेवण्यासाठी काकडीचा वापर केला जातो. कोरड्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी काकडी अतिशय लाभदायी आहे.

काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आढळून येते. या पाण्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होते. त्वचेसाठी काकडीचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. आज आपण काकडीपासून बनवल्या जाणाऱ्या फेसपॅक्सबद्दल जाणून घेणार आहोत.

काकडी आणि कोरफडचा फेसपॅक

कोरड्या त्वचेसाठी हा फेसपॅक अतिशय फायदेशीर आहे. काकडीसोबतच कोरफड देखील त्वचेसाठी लाभदायी आहे. कोरफड आणि काकडीचा हा फेसपॅक त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करते.

हा फेसपॅक बनवण्यासाठी काकडी धुवून घ्या. तिचे साल काढा आणि काकडी किसून घ्या. आता या किसलेल्या काकडीमध्ये कोरफड जेल किंवा कोरफडीचा गर घाला. हे मिश्रण एकत्र करून या फेसपॅकने चेहऱ्यावर १५ मिनिटे मसाज करा. त्यानंतर हा फेसपॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर, चेहरा धुवून टाका.

काकडी आणि ओटमीलचा फेसपॅक

जर तुमच्या त्वचेवर प्रमाणापेक्षा जास्त पिंपल्स येत असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावर डाग येत असतील तर हा फेसपॅक तुमच्यासाठी बेस्ट आहे. काकडी तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करते तर ओटमील त्वचेतील मृतपेशी काढून टाकण्यास मदत करते.

काकडी आणि ओटमीलचा फेसपॅक बनवण्यासाठी एक काकडी घ्या. तिचे साल काढून ती किसून घ्या. आता या किसलेल्या काकडीतील रस काढून घ्या. आता या काकडीच्या रसामध्ये २ चमचे ओटमील मिसळून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये १ चमचा मध घाला आणि हे मिश्रण एकजीव करा.

त्यानंतर हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर, २०-२५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. अधिक चांगल्या परिणामांसाठी हा फेसपॅक आठवड्यातून दोनवेळा चेहऱ्यावर लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

SCROLL FOR NEXT