Diwali 2023 esakal
लाइफस्टाइल

Diwali 2023 : दिवाळीच्या पूजेसाठी आणा मातेची अशीच मूर्ती, वर्षभर तिजोरी भरलेली राहील!

दिवाळीवेळी लक्ष्मी मातेच्या फोटो किंवा मूर्तीबाबत या चूका टाळा

Pooja Karande-Kadam

Diwali 2023 :

दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे, जो आता अगदी जवळ आला आहे. अशा परिस्थितीत या उत्सवाची सर्वांनी तयारी सुरू केली आहे. या सणाला ज्याला दिव्यांचा उत्सव म्हणतात.

यावर्षी दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी आहे. अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणूनही हा सण साजरा केला जातो. खरे तर दिवाळीची पूजा प्रत्येकाच्या घरी होते. पण वर्षातून एकदा येणाऱ्या या सणावेळी काही चूका केल्याने त्याचे परिणाम वर्षभर आपल्याला भोगावे लागू शकतात.

पूजेच्या वेळी लोक छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. जसे लोक लक्ष्मी देवीची मूर्ती खरेदी करताना खूप चुका करतात. पूजेसाठी लक्ष्मी मातेची मूर्ती कशी असावी, याचे शास्त्रात काही नियम सांगितले आहेत.  चला तर मग जाणून घेऊया दिवाळीत देवीची कोण्त्या स्वरूरातील मूर्ती घरी आणावी?

देवी लक्ष्मी कमळाच्या फुलावर विराजमान असावी

जर तुम्ही देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करत असाल तर देवी लक्ष्मी कमळाच्या फुलावर विराजमान आहे याची खात्री करा. म्हणजे चिखलात राहूनही कमळ सुंदर फुलते, त्याचप्रमाणे प्रत्येकाने जीवनातील नकारात्मकता टाळावी.

उभारलेली देवी नको

ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मीची मूर्ती नेहमी आसनस्थ असावी. देवी स्वभावाने अतिशय चंचल असते असे मानले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही तिची उभी मूर्ती तुमच्या घरी आणली तर ती तुमच्याकडे येताच निघून जाते.

देवीची मूर्ती नेहमी बैठी अवस्थेतील हवी

लक्ष्मीदेवीच्या हात कसे असावेत

माता लक्ष्मीच्या हातातून सोन्याच्या नाण्यांचा वर्षाव होतो. लक्ष्मी देवीची मूर्ती खरेदी करताना हे लक्षात ठेवा. त्यांच्या हातातून सोण्याची नाणी पडत आहेत याची खात्री करा. अशी मूर्ती अतिशय शुभ मानली जाते.

लक्ष्मीदेवीच्या मूर्तीसोबत ऐरावत हत्ती

अशी लक्ष्मीची मूर्ती घरी आणल्यास ज्यामध्ये ऐरावत हत्ती दोन्ही बाजूंनी संपत्तीचा वर्षाव करत असतील. तर ते अतिशय शुभ चित्र आहे. अशा मूर्तीची स्थापना केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

लक्ष्मीदेवीच्या मूर्तीसोबत ऐरावत हत्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT