लाइफस्टाइल

Budget Bali Trip : बजेटमध्ये करायचीय बाली ट्रिप? अशा प्रकारे करा प्लॅनिंग; वाचा टिप्स

कमी बजेटमध्ये बालीचा प्रवास करायचा असेल तर या टिप्स फॉलो करा.

Aishwarya Musale

इंडोनेशियातील सर्वात सुंदर आणि सांस्कृतिक शहरांच्या यादीत बाली अव्वल आहे. जर तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही इथे जाऊ शकता. लोकांना वाटतं की बालीला गेलं की खूप खर्च होईल, पण तसं नाही. अगदी कमी बजेटमध्येही तुम्ही बाली ट्रिपचे नियोजन करू शकता. आज आम्ही तुम्हाला बाली ट्रिप स्वस्तात प्लॅन करण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत.

व्हिसा

या ठिकाणाची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे ठिकाण भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे. तुम्ही एक महिना व्हिसाशिवाय बालीत फिरू शकता. त्यामुळे तुमचा व्हिसाचा खर्चही वाचेल.

बाली ट्रिप अशी करा प्लॅन

जर तुम्ही बालीला भेट देण्याचा विचार करत असाल तर ऑफ सीझनमध्ये येथे जाण्याचा प्रयत्न करा. कारण अशा वेळी तुम्हाला कमी प्राईजमध्ये तिकिटे मिळतील.

  • दिल्ली ते बाली तिकीटाची किंमत 12,000 रुपयांपासून सुरू होते, परंतु अशा अनेक बँक आणि क्रेडिट कार्डे आहेत जी तुम्हाला तिकिटांवर चांगली सूट देतात. अशा परिस्थितीत तुम्हाला 10,000 रुपयांचे तिकीट सहज मिळेल.

  • जर आपण बालीमधील हॉटेल्सबद्दल बोललो तर तुम्हाला 1500 ते 2000 रुपयांच्या दरम्यान हॉटेल्स मिळतील.

  • रेस्टॉरंटमध्ये खाण्याऐवजी तुम्ही स्ट्रीट फूड ट्राय करू शकता. हे खाल्ल्यानंतर तुम्हाला खूप बरे वाटेल.

  • अशा प्रकारे तुम्ही कमी बजेटमध्ये बालीला सहज भेट देऊ शकता.

  • लक्षात ठेवा की कॅब बुक करण्याऐवजी तुम्ही लोकल ट्रांसपोर्टने प्रवास करा. या मार्गाने प्रवास करणे तुमच्यासाठी खूपच स्वस्त असेल.

  • बालीमधील हॉटेल्स आणि शॉपिंगवरील खर्च कमी करून तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता.

बाली मध्ये भेट देण्याची ठिकाणे

येथे तुम्ही कुटा शहरात जाऊ शकता ज्याला बालीचे हृदय म्हटले जाते. तुम्हाला आलिशान हॉटेल आणि ट्रेंडी फॅशन स्टोअर्स आवडतील. याशिवाय, तुम्ही उबुद, पुरा बैसाकी मंदिर, नुसा बेट, सिडमिन व्हॅली, कुटा बीच, पुरा उलुन दानु ब्राटन, पुरा तानाह लॉट आणि उलुवातु मंदिर पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : शतक केलं, GT ला फायनलमध्येही नेलं अन् मग शुभमन गिलनं आई-वडिलांना मैदानातच मारली कडकडून मिठी; Video Viral

ऐश्वर्या नारकर यांना पाहून खुश पण प्रोमो पाहून भ्रमनिरास; असं काय आहे 'आमच्या लाडक्या नाईक बाई' प्रोमोमध्ये?

Latest Marathi Update Live: पुण्यात विषारी दारू मृत्यु प्रकरणी युवक काँग्रेसच आंदोलन

गल्लीतील सोया चाप आता होणार ग्लोबल! योगींच्या ODOC योजनेत गाझियाबादची निवड; पाहा काय आहे क्रेझ?

Samsung Galaxy S25 स्मार्टफोनवर चक्क 24 हजार रुपयांचा डिस्काउंट; खरेदीसाठी रांगा, कुठे सुरुय ऑफर पाहा

SCROLL FOR NEXT