Guru Purnima 2023 esakal
लाइफस्टाइल

Guru Purnima 2023 : आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पाडणाऱ्या तुमच्या गुरूंसाठी खास गिफ्ट आयडियाज

गुरु हा तुमच्या आयुष्यातला असा व्यक्ती असतो ज्याने तुम्हाला एक उत्तम व्यक्ती म्हणून विकसित करण्यात मदत केली आहे

साक्षी राऊत

Guru Purnima 2023 : गुरू किंवा शिक्षकांना समर्पित असा खास दिवस म्हणजे गुरू पौर्णिमा. हा शुभ दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तुमच्या गुरूंचे आभार मानण्याची त्यांच्याप्रती कतज्ञता व्यक्त करण्याची ही उत्तम संधी आहे.

गुरु हा तुमच्या आयुष्यातला असा व्यक्ती असतो ज्याने तुम्हाला एक उत्तम व्यक्ती म्हणून विकसित करण्यात मदत केली आहे किंवा तो एक आध्यात्मिक गुरू देखील असू शकतो ज्याचा मार्ग तुम्हाला ज्ञानाकडे नेतो.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः

गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवेनमः

गुरु-दक्षिणा ही जुनी प्रथा तुम्हाला आठवते काय? आपल्या जीवनात गुरूला खूप महत्त्व आहे कारण तेच तुम्हाला ज्ञान देतात आणि तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतात. म्हणूनच 'गुरु बिन ज्ञान नही' असे म्हणतात. तेव्हा आपण आपल्या आधुनिक काळातील गुरूंना प्रेमाचे प्रतीक म्हणून काही भेटवस्तू देऊन हा दिवस खास बनवू शकतो. चला बेस्ट गिफ्ट्सच्या काही आयडियाज जाणून घेऊया.

स्पेशल लेटर

पत्राला माणसाच्या आयुष्यात विशेष स्थान आहे. जर तुम्ही तुमच्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढून तुमच्या गुरूंना हृदयस्पर्शी पत्र लिहिलं, तर त्यांचे प्रेम आणि आठवणींनी डोळे पाणावतील. स्पेशल नोटवर 'गुरूंना धन्यवाद देण्यासाठी सुरेख शब्दांत त्यांच्याबाबत काही ओळी लिहा, त्यांना धन्यवाद करा' शब्दात व्यक्त करण्यापेक्षा तुम्ही दिलेल्या हृदयस्पर्शी पत्राने तुम्ही गुरूंच्या मनात तुमचे वेगळे स्थान निर्माण कराल .

फुले

तुम्ही फुलांचा एक मोठा बुके देऊनही तुमच्या गुरूंना खुश करू शकता. तुमच्या गुरूंना ताजे फूल आणि त्याचा चौफेर दरवळणारा सुगंध तुमच्या आणि त्यांच्या फुलाप्रमाणे फुलणाऱ्या नात्याचे प्रतीक असेल. त्यांचे आशीर्वाद घ्या आणि तुमचा दिवस नव्याने सुरू करा! (Guru Purnima)

कॉफी मग

हल्ली कपवर आठवणींच्या क्षणांचा फोटो लावून ते गिफ्ट करण्याचा ट्रेंड आहे. आता काळ बदलत असताना आपले गुरूही कालांतराने आधुनिक झाले आहेत. म्हणून, जर तुम्ही या दिवशी तुमच्या गुरूंना सर्प्राइज देत असाच कॉफी कप किंवा चहाचा मग दिला तर ते खुश होतील. त्यावर त्यांना आवडत असलेले विचार लिहा. तुमचे गुरू खुश होतील.

डायरी

तुम्ही शाळा किंवा महाविद्यालयात असाल तर तुमच्या शिक्षकांना तुम्ही सुरेख डायरीसुद्धा गिफ्ट व्यक्त करू शकता. तुमच्या गुरूंनी प्रदान केलेल्या ज्ञानाचे आभार मानण्यासाठी तुम्ही वरील आयडियाजचा वापर करू शकता. (Guru purnima 2023)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT