Guru Purnima sakal
लाइफस्टाइल

Guru Purnima 2023: गुरुपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही या चुका करू नका

वर्षी गुरुपौर्णिमा 3 जुलै 2023, सोमवारी साजरी केली जाईल.

Aishwarya Musale

या वर्षी गुरुपौर्णिमा 3 जुलै 2023, सोमवारी साजरी केली जाईल. गुरु पौर्णिमा हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे, जो गुरुंची उपासना करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी समर्पित आहे. हा सण आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात.

गुरुपौर्णिमा हा सण महर्षी वेद व्यास यांची जयंती म्हणूनही साजरा केला जातो, कारण व्यासजींना हिंदू धर्मात आदिगुरू मानले जाते आणि त्यांनी महाभारताची रचना केली. हिंदू धर्मात गुरूला देवापेक्षा वरचा दर्जा देण्यात आला आहे. गुरूंचा आदर करणारी व्यक्ती नेहमीच यशस्वी असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुसमोर काही चुका करणे टाळावे. चला जाणून घेऊया गुरुपौर्णिमेला गुरूसमोर कोणत्या चुका करू नयेत.

माणूस आयुष्यात कितीही यशस्वी झाला तरी त्याने गुरूच्या आसनावर बसू नये. गुरु जर खुर्चीवर बसणार असतील तर त्या व्यक्तीने खुर्चीवर बसू नये. मात्र, गुरु जमिनीवर बसले असतील तर शिष्यही जमिनीवर बसू शकतो.

भिंतीला किंवा इतर कोणत्याही गोष्टीला टेकून गुरुसमोर बसू नका. तसेच गुरूंसमोर पाय पसरून बसू नका. असे करणे म्हणजे गुरूंचा अपमान करण्यासारखे आहे.

तुमच्या गुरूबद्दल कधीही वाईट बोलू नका. असे करणे महापाप मानले जाते. याउलट, जर दुसरा माणूस गुरूचे वाईट बोल्ट असेल तर त्याला गप्प बसवा किंवा उठून तिथून निघून जा, कारण गुरूच्या वाईट गोष्टी ऐकणे देखील पापासारखेच आहे.

धन-दौलतच्या बाबतीत माणूस कितीही मोठा असला तरी त्याने गुरूंसमोर कधीही कीर्ती दाखवू नये. कारण गुरूंनी दिलेल्या ज्ञानानेच शिष्यांचे कल्याण होते. गुरुच्या ज्ञानाची किंमत कोणत्याही संपत्तीने फेडता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT