Easy rangoli designs for Guru Purnima 2025  Sakal
लाइफस्टाइल

Guru Purnima 2025 Rangoli Designs: यंदा सोप्या रांगोळी डिझाइन्ससह गुरुपौर्णिमेला वाढवा घराचे सौंदर्य

Easy rangoli designs for Guru Purnima 2025: गुरूपौर्णिमेनिमित्त घराच्या अंगणात सुंदर रांगोळी काढून हा दिवस अधिक खास बनवू शकता. या पवित्र दिवशी घराची शोभा वाढवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी अंगणात सुंदर रांगोळ्या काढण्याची परंपरा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या केवळ सौंदर्यच वाढवत नाहीत, तर गुरूंप्रती श्रद्धा आणि भक्तीही व्यक्त करतात.

Puja Bonkile

Guru Purnima decoration ideas with rangoli: यंदा गुरू पौर्णिमेला 10 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गुरूचा सन्मान करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा हा दिवस आहे. गुरू पोर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. महर्षि व्यास यांना आदिगुरू मानले जाते, म्हणून त्यांचा जन्मदिनी गुरू पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी गुरूंना वंदन केले जाते.

या पवित्र दिवशी घराची शोभा वाढवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी अंगणात सुंदर रांगोळ्या काढण्याची परंपरा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या केवळ सौंदर्यच वाढवत नाहीत, तर गुरूंप्रती श्रद्धा आणि भक्तीही व्यक्त करतात.

रंगबिरंगी रांगोळ्या, फुलांचे प्रकार, कमळ, ॐ, स्वस्तिक किंवा गुरु-शिष्य प्रतीके यांसारख्या थीम्स वापरून तुम्ही घराच्या अंगणाला आकर्षक रूप देऊ शकता. रंग, फुले, दिवे आणि रांगोळी पावडर यांचा वापर करून तुम्ही कमी वेळात सुंदर रांगोळी बनवू शकता.

यंदाच्या गुरुपौर्णिमेला तुमच्या सर्जनशीलतेला वाव द्या आणि गुरूंना समर्पित अशा रांगोळ्यांनी घर सजवा. जाणून घ्या, गुरुपौर्णिमेनिमित्त काढता येतील अशा सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाइन्स!

घरातील अंगणात रांगोळी काढणे शुभ मानले जाते. गुरू पौर्णिमेनिमित्त फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे काढू शकता. गुरूचे पाय काढून त्यावर पांढऱ्या रंगाचे फुल काढू शकता. त्याभोवती दिवे दिखील लाऊ शकता.

Guru Purnima Rangoli Designs

कमळाचे फुल काढून त्यात गुरू पौर्णिमा लिहावे. तुम्ही पिवळ्या किंवा केशरी रंगाचा वापर करू शकता. आजकाल बाजारात मेणाचे सुंदर दिवे मिळतात. ते देखील रांगोळीच्या बाजुला लावू शकता.

Guru Purnima Rangoli Designs

गुरू पौर्णिमेला झेंडुच्या फुलांचा वापर करून सुंदर रांगोळी काढू शकता.फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे गोलाकारमध्ये पाऊल काढू शकता.

Guru Purnima Rangoli Designs

गुरू पौर्णिमेला फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे रांगोळीचे सुंदर फुल काढू शकता. त्यात तुम्ही केशरी किंवा निळा रंग वापरून पांढऱ्या रंगाने गुरू पौर्णिमा लिहू शकता.

Guru Purnima Rangoli Designs

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

Pune News : शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी मिळकतकराची अट रद्द

SCROLL FOR NEXT