लाइफस्टाइल

Cloves Water Benefits : आरोग्याच्या 'या' समस्यांवर लवंग ठरते उपयोगी; जाणून घ्या फायदे

लवंगाचे पाणी प्यायल्याने होतील अनेक फायदे...

Aishwarya Musale

प्रथिने, कार्बोहायड्रेट, लोह, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि तांबे यांसारखे घटक लवंगात आढळतात. खोकला आणि सर्दी झाल्यास अनेकदा लवंग खाण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, याचे सेवन केल्यास पचन आणि वजन दोन्ही सुधारू शकतात. लवंगाचे पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात.

जर तुम्हाला अपचन, पोटात जळजळ किंवा गॅसचा त्रास होत असेल तर तुम्ही लवंगाचे पाणी पिऊ शकता. त्यात अँटी इन्फ्लेमेटरी कंपाउंड युजेनॉल असते. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर लवंगाचे पाणी प्यायल्यास डायजेस्टिव एंझाइम्सचा स्राव सुधारतो ज्यामुळे अपचन सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. लवंगात फायबर देखील असते जे पचन सुधारते.

वजन कमी

लवंगाचे पाणी प्यायल्याने तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात तुम्हाला खूप मदत होऊ शकते. त्यात मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात जे चयापचय वाढवण्याचे काम करतात.

प्रतिकारशक्ती वाढते

लवंगाच्या पाण्याचे सेवन केल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. हे पाणी संसर्ग आणि फ्लू विषाणूशी लढण्यास मदत करते. लवंगाच्या पाण्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात.

लवंगाचे पाणी कसे बनवायचे

  • लवंग - 8 ते 10

  • लिंबाचा तुकडा

  • गरम पाणी

लवंगाचे पाणी बनवण्याची पद्धत

  • लवंगाचे पाणी तयार करण्यासाठी 8 ते 10 लवंग बारीक करा.

  • ही पावडर एक ग्लास गरम पाण्यात टाका.

  • आता हे पाणी 14 मिनिटे झाकून ठेवा.

  • नंतर त्यावर लिंबाचा तुकडा घाला.

  • तुम्ही चवीनुसार मध देखील घालू शकता.

  • आता तुमचे लवंगी पाणी तयार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT