Winter  sakal
लाइफस्टाइल

Winter Tips: थंडीच्या दिवसांत चुकूनही खाऊ नका या गोष्टी; बिघडू शकते आरोग्य

हिवाळ्यात खाऊ नका या गोष्टी , बिघडू शकते आरोग्य

Aishwarya Musale

थंडीचे वातावरण सुरू आहे. थंडीच्या मोसमात आजारांचा धोका जास्त असतो. कारण या ऋतूत बहुतेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. अशा परिस्थितीत हिवाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी काही गोष्टींचा आहारात समावेश करू शकता. पण हिवाळ्यात काही गोष्टींचे सेवन टाळावे.

हिवाळ्यात आहाराची पूरेपूर काळजी घ्यावीच लागते. बदलत्या वातावरणाने तुमची इम्युनिटी कमकुवत होऊ शकते. असे झाल्यास तुम्हाला कुठलाही आजार लवकर होऊ शकतो. तेव्हा हिवाळ्यात आहारात योग्य पदार्थ आहेत याची खात्री नक्की करून घ्यावी. हिवाळ्यात चुकूनही या गोष्टी खाऊ नका.

हृदय रोग असणाऱ्यांनी चुकूनही खाऊ नये हे पदार्थ

रेड मीट

हार्ट पेंशट्सने चुकूनही रेड मीट खाऊ नये. त्याने सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढेल. तुमच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

फास्ट फूड

हिवाळ्यात फास्ट फूड खाणे टाळा. फास्ट फूडमध्ये तेल आणि मसाल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. ज्याने बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. फास्ट फूड खाल्ल्याने डायबिटीजचाही धोका वाढतो.

तेलकट पदार्थ

हिवाळ्यात तेलकट पदार्थ जसे की समोसा, पकोडे तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्ऱॉल वाढवण्यास कारणीभूत ठरते. तेव्हा हे पदार्थ हिवाळ्यात न खाल्लेलेच बरे.

गोड पदार्थ

थंडीच्या काळात काही वस्तू शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढवण्यास कारणीभूत ठरतात. चहा, कॉफी, आयस्क्रिम आणि पेस्ट्रीचे सेवन कमी करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT