लाइफस्टाइल

Superfood for Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी या पदार्थांचा करावा आहारात समावेश, रक्तातील साखरेची समस्या होईल दूर

मधुमेहाच्या रुग्णांनी या पदार्थांचा करावा आहारात समावेश

Aishwarya Musale

जगभरात मधुमेहाचा धोका वाढला आहे. मधुमेह हा आजार आता सामान्य होत चालला आहे. प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती हा मधुमेह ग्रस्त असतो. वाढलेल्या मधुमेहामुळे हृदयविकार, किडनीचे आजार, न्यूरोपॅथी, दृष्टी कमी होणे इत्यादी आरोग्यविषयक आजार होऊ शकतात.

योग्य खाण्याच्या सवयी आणि योग्य जीवनशैलीचे पालन करूनच तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता. आता प्रश्न असा आहे की मधुमेही रुग्णांनी काय खावे? तज्ञांच्या मते, कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न, उच्च फायबर आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे पदार्थ उत्तम आहेत

मधुमेहाच्या रुग्णांनी स्प्राउट्स सॅलडचे सेवन करावे. त्यात फायबर मुबलक प्रमाणात आढळते जे हळूहळू पचते आणि साखर वाढण्यापासून प्रतिबंधित करते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठीही अंडी हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात आणि त्यात हेल्दी फॅट्स देखील असतात. यामुळे साखरेची वाढ होत नाही.

बेरीचे सेवन करणे देखील फायदेशीर ठरू शकते. त्यात कर्बोदके असतात आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. त्याच वेळी, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील खूप कमी आहे. जे रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवते.

संत्र्याच्या सेवनाने मधुमेहाचे रुग्णही निरोगी राहू शकतात. हे एक लिंबूवर्गीय फळ आहे, त्यात व्हिटॅमिन सी, फायबर, फोलेट, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.

ड्रायफ्रूटचे सेवन करणे देखील फायदेशीर ठरू शकते. स्नॅक म्हणून खाण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. खरं तर त्यात हेल्दी फॅट्स असतात. फायबर देखील योग्य प्रमाणात असते आणि कार्बोहायड्रेट्स देखील कमी असतात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी निरोगी ठेवण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT