लाइफस्टाइल

Music Therapy: स्ट्रेस-एन्झायटी टाळण्यासाठी फायद्याची ठरतेय 'म्युझिक थेरपी' ; जाणून घ्या त्यामागील शास्त्र

प्रत्येकाला आपल्या जीवनात वेगवेगळ्या कारणांमुळे तणावाशी सामना करावा लागतो.

Aishwarya Musale

प्रत्येकाला आपल्या जीवनात वेगवेगळ्या कारणांमुळे तणावाशी सामना करावा लागतो. त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. काही जणांना आपण तणावाखाली आहोत याची जाणीव होत नाही, ते कधी कधी विविध लक्षणांद्वारे आपल्याला लक्षात येते.

जेव्हा आपल्याला एकटेपणा जाणवतो तेव्हा खूप तणाव जाणवू लागतो. हे टाळण्यासाठी लोकांना चांगला आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप घेण्याचा सल्ला दिला जात आहे. पण तुम्हाला माहित आहे का की या संकटाच्या काळात म्युझिक थेरपी तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते.

तज्ञ म्हणतात की या कठीण काळात लोकांसाठी म्युझिक खूप फायदेशीर ठरू शकते. म्युझिक तुम्हाला एकटेपणामुळे येणाऱ्या तणावापासून वाचवू शकते. खरं तर, जेव्हा आपण संगीताचे सूर ऐकतो तेव्हा आपल्याला चांगले वाटणारे सेरोटोनिन आणि एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात. त्यांच्या प्रोडक्शनमुळे मानवांमध्ये तणावाची समस्या कमी होऊ शकते.

नैराश्याचा धोका कमी

या विषयावर अनेक अहवाल समोर आले आहेत, ज्यामध्ये म्युझिक थेरपीच्या माध्यमातून तणाव आणि चिंतेची समस्या टाळता येऊ शकते, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. हार्वर्ड हेल्थने 1994-99 दरम्यान केलेल्या संशोधनानुसार संगीतामुळे नैराश्याचा धोका कमी होतो.

तणाव कमी करण्यासाठी खालील उपाययोजना देखील करता येतील.

१) स्वत:ची काळजी घ्या

- पुरेशी विश्रांती झोप घ्यावी, निरोगी खा.

- अतिरिक्त व्यायाम, जास्त शारीरिक श्रम टाळा, आपल्याला झेपेल तेवढेच काम काम करावे.

२) शारीरिक तपासणी करून घेणे

- तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रक्ताची तपासणी करून घेणे.

- त्यामुळे तणावामुळे आपल्या आरोग्यावर काही परिणाम झाला असल्यास आढळून येईल.

३) सोशल मीडियावरील बातम्यांपासून, टीव्हीपासून काही काळ दूर रहावे, प्रवचन, मेडिटेशन करणे, आपल्या ताणांबद्दल मित्रांशी किंवा जवळच्या लोकांशी संवाद साधावा.

४) ड्रग्ज, दारू, सिगारेट, तंबाखू इत्यादी व्यसन लागणाऱ्या गोष्टीपासून दूर रहा.

५) मानसिक तज्ज्ञ काही औषधे देऊन काही काळासाठी तुमचा तणाव कमी करतील. त्यांना नियमित भेटणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT