stress sakal
लाइफस्टाइल

Health Care News: ताण आणि चिंता नियंत्रित करण्याचे प्रभावी मार्ग नेमके कोणते? जाणून घ्या

अशा प्रकारे तुम्हाला चिंता आणि तणावापासून आराम मिळू शकतो.

Aishwarya Musale

आपल्या मानसिक आरोग्याचा आपल्या शारीरिक आरोग्याशी थेट संबंध आहे. धावपळीच्या या आयुष्यात तणाव ही एक खुप मोठी समस्या आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीने तणाव निर्माण होतो आणि या तणावाने अनेकदा दैनंदिन जीवनावर खुप खोलवर परिणाम पडतो.

तणाव दीर्घकाळ राहिल्यास कधी कधी चिंतेचे रूप धारण करतो. त्यामुळे मानसिक आजाराचेही बळी पडण्याची शक्यता असते.

एकाग्रता लोप पावणे, डोकेदुखी सुरू होणे, थकवा वाटू लागणे चिडचिडेपणा येणे. अशा अनेक समस्यां निर्माण होतात. हा तणाव लवकरात लवकर घालवणे खुप जास्त गरजेचे असते.

कधी कधी तणाव वाढल्यास लोक मद्य, ड्रग्ज, धुम्रपान सेवन सुरू करतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटत असले तरी तणाव कायमस्वरूपी दूर होत नाही. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी आपली जीवनपद्धती बदलण्याची गरज आहे.

तणाव दूर करण्यासाठी काय आहेत उपाय?

१. स्वत:साठी थोडा वेळ काढून योगासने आणि हलका व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे मन प्रसन्न वाटेल आणि तणाव दुर होईल.

२. दीर्घ श्वास घ्या. त्यामुळे शरिरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते शरीरातील स्नायूंवरील ताण कमी झाल्याने त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

३. घरच्यांसोबत वेळ घालवा, मित्रांना फोन करा. मित्र-मैत्रीणींशी आणि आवडत्या व्यक्तींशी मनसोक्त गप्पा मारा. त्यामुळे मनावरील ताण कमी होतो.

४. आपला छंद आपला तणाव कमी करण्यास मदत करतो. वाचन, लेखन किंवा कोणत्याही छंदासाठी थोडा वेळ काढा. स्वतःची करमणूक करा. लक्ष त्याकडे केंद्रीत केल्याने तणाव हलका होण्यास मदत होते.

५. झोप ही आपल्या आयुष्यातील खुप महत्त्वाची बाब आहे. योग्य आणि आवश्यक ती झोप घेतल्याने तणाव कमी होतो. त्यामुळे आवश्यक ती झोप घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT