लाइफस्टाइल

Health Care News : फळे खाण्याची योग्य वेळ कोणती? चुकीच्या वेळी खाल्ल्यास काय होईल? जाणून घ्या

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी फळांचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे.

Aishwarya Musale

तंदुरुस्त राहण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी फळे खाणे खूप आरोग्यदायी आहे. आपण कधीही फळे खाऊ शकतो, पण तुम्हाला माहित आहे का की एक वेळ अशी असते जेव्हा फळे खाणे जास्त फायदेशीर असते.

मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा यांसारख्या आजारांनी जवळजवळ प्रत्येकजण हैराण आहे. या आजारांपासून आराम मिळवण्यासाठी फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

फळे खाल्ल्याने पचनक्रिया योग्य राहते. दिवसाची सुरुवात निरोगी करायची असेल तर फळांनी करा, असे डॉक्टर अनेकदा सांगतात. यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहाल. अशा परिस्थितीत रिकाम्या पोटी कोणती फळे खाऊ शकतात असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत याबद्दल सांगणार आहोत.

फळे खाण्याची योग्य वेळ कोणती?

अशी काही फळे आहेत जी तुम्ही रिकाम्या पोटी सहज खाऊ शकता. परंतु अशी अनेक फळे आहेत जी तुम्ही ब्रेकफास्ट किंवा दुपारच्या जेवणादरम्यान म्हणजेच 10 ते 12 च्या दरम्यान खाऊ शकता. हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. अशी अनेक फळे आहेत ज्यामध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ते सकाळी लवकर खाण्याऐवजी दुपारी 10-12 वाजेपूर्वी खावे.

रिकाम्या पोटी हे फळं खाऊ शकता

किवी

किवीमध्ये भरपूर पोषक असतात जे तुम्ही रिकाम्या पोटी खाऊ शकता. डेंग्यूच्या आजारात किवी खूप चांगली आहे. यामुळे पचनक्रिया बरोबर राहते आणि शरीराला भरपूर ऊर्जाही मिळते.

सफरचंद

रिकाम्या पोटी तुम्ही सफरचंद आरामात खाऊ शकता. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यासोबतच शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही. बद्धकोष्ठता आणि गॅसपासून मुक्ती मिळेल. पचनसंस्था चांगली राहील.

डाळिंब

डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी असतात. तुम्ही रिकाम्या पोटी आरामात डाळिंब खाऊ शकता. डाळिंब खाल्ल्याने शरीरात लोहाची कमतरता होत नाही. आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली असते.

पपई

पपई खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर पपई सर्वोत्तम आहे. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. बद्धकोष्ठता आणि पोटफुगीच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT