लाइफस्टाइल

तोच तोपणा सोडा! आता स्वयंपाक घराला द्या 'हे' हटके रंग

'या' हटके रंगांनी सजवा तुमचं स्वयंपाक घर

शर्वरी जोशी

स्वयंपाक घरातील कोणतीही वस्तू खरेदी करताना स्त्रिया हजारवेळा विचार करत असतात. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भांड्यांची क्वालिटी, रंग, आकार या सगळ्याचा विचार केला जातो. मात्र, अनेकदा स्वयंपाक घराला रंग देण्याची वेळ आली की नेहमीप्रमाणे टिपिकल रंगच दिला जातो. मात्र, गेल्या काही काळात स्वयंपाक घराची रचना, रंग यावरही विशेष भर दिला जात आहे. म्हणूनच, स्वयंपाक घराला टिपिकल रंगदेण्याऐवजी कोणते नवे रंग देता येतील ते पाहुयात. (home-decor-select-right-colors-for-your-kitchen)

१. फ्रेश ग्रीन कलर -

स्वयंपाक घराला हिरवा रंग देणं हे काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांच्या स्वयंपाक घराला हिरवा रंग असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, हिरव्या रंगातही असंख्य शेड्स आहेत. त्यातील फ्रेश ग्रीन कलर स्वयंपाक घराला उत्तम शोभून दिसतो. स्वयंपाक घराच्या भिंतींना फ्रेश ग्रीन कलर दिल्यानंतर वरती बसवलेल्या कपाटं म्हणजेच कॅबिनेट्सला न्यूट्रल ठेवा. तर, ट्रॉलीला फ्रेश मिंट ग्रीन कलर द्या. यामुळे स्वयंपाक घर अधिक खुलून दिसतं.

२. कन्टेम्पररी किचन -

सध्याच्या काळात किचनचं मेकओव्हर करताना अनेकदा पांढऱ्या रंगाचा वापर केला जातो. मात्र, तुम्हाला पांढरा रंग नको असेल तर आयसी ग्रे कलरचा वापर करु शकता. हा रंग घरातील भांड्यांसोबतही छान मॅच होतो. तसंच स्वयंपाक घरातील भिंतींना आकाशी रंगदेखील देता येऊ शकतो. सध्याच्या काळात मॉर्डन किचनसाठी स्टील ग्रे आणि आयसी ग्रे रंग सर्वात जास्त वापरले जात आहेत.

३. गुलाबी -

गुलाबी रंगामध्येदेखील अनेक रंगाच्या शेड्स उपलब्ध आहेत. यापैकी बेबी पिंक, डार्क पिंक हे रंग स्वयंपाक घरात जास्त खुलून दिसतात. मात्र, हे रंग देत असताना स्वयंपाक घरात प्रकाश जास्त येईल याची काळजी घ्यावी.

४. स्ट्राँग कलर -

जर तुम्हाला डार्क किंवा भडक रंग आवडत असतील तर तुम्ही स्ट्राँग कलरची नक्कीच निवड करु शकता. यात सध्या युनिकॉर्न पॅलेट, रेनबो कलर्स जास्त वापरले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाकरीत रबरबँड, ग्राहकानं शेअर केला VIDEO

आधी हात पकडला, नंतर कपडे काढत नको ते करण्याचा प्रयत्न, ओला चालकाचं महिलेसोबत गैरकृत्य; मध्यरात्री नवी मुंबईत काय घडलं?

Marathi News Live Updates : एमपीएससीचे विद्यार्थी चर्चेला तयार- सुप्रिया सुळे

बापरे! राणादाने घटवलं तब्बल २५ किलो वजन, व्यायामाबद्दल बोलताना हार्दिक जोशी म्हणाला...

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

SCROLL FOR NEXT