Nails  sakal
लाइफस्टाइल

Dirty Nails Cleaning Tips: नखांचा पिवळेपणा दूर करायचाय? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!

सुंदर आणि स्वच्छ नखे आपली सुंदरता वाढवण्याचे काम करतात.

Aishwarya Musale

चेहरा आणि शरीराच्या इतर भागांना सुंदर बनवण्यासाठी आपण अनेकदा खूप प्रयत्न करतो, पण नखांच्या स्वच्छतेकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. नखं हे कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्त करतात, त्यामुळे त्याची साफसफाई खूप महत्त्वाची असते.

मॉडर्न मुली आजही नेल पेंटच्या सहाय्याने नखं सुंदर बनवतात, पण मुले शरीराच्या या भागाकडे जास्त लक्ष देत नाहीत, त्यामुळे नखांमध्ये घाण साचते आणि ते पिवळे दिसू लागतात. आज आम्ही तुम्हाला ते उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

नखे स्वच्छ करण्याचे सोपे मार्ग

1. लिंबाच्या रसात नखं काही वेळ बुडवून ठेवा आणि नंतर मऊ ब्रशने घासून घाण साफ करा, नखांना अप्रतिम चमक येईल, पण लक्षात ठेवा की नखांच्या आजूबाजूची त्वचा कापू नये. कारण यामुळे तीव्र जळजळ होऊ शकते.

2. लसणातील अँटी-फंगल गुणधर्म नखं साफ करण्यास मदत करतात. यासाठी लसूण पेस्ट वापरू शकता.

3. लिंबाचा रस आणि मीठ मिसळा आणि ब्रशच्या मदतीने नखांवर घासून घ्या, यामुळे नखांवरचे डाग निघून जातील.

4. लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा वापरूनही डाग दूर होतात, अशा परिस्थितीत नखं स्वच्छ करण्यासाठी या दोन गोष्टींचे मिश्रण वापरले जाते.

5. नखांवरचे पिवळे डाग काढण्यासाठी पांढऱ्या व्हिनेगरचा वापर केल्यास त्याचा परिणाम दिसून येईल आणि नखांची चमकही वाढेल.

6. दात स्वच्छ करण्यासाठी आपण टूथपेस्टचा वापर करतो, पण त्यात असणारे पेरोक्साइड नखांचे डागही दूर करेल हे फार कमी लोकांना माहिती आहे.

7. खोबरेल तेल बहुतेक वेळा केस आणि त्वचेसाठी वापरले जाते, पण जर तुम्ही ते गरम करून नखांवर मसाज केले तर नक्कीच फायदा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT