Gardening Tips esakal
लाइफस्टाइल

Gardening Tips : घरातील प्लॅस्टिकच्या टबमध्ये अशा पद्धतीने लावा वॉटर लिली

वॉटर लिली ही एक सुंदर आणि आकर्षक वनस्पती आहे. या वॉटर लिलीमध्ये अनेक प्रकारचे रंग पहायला मिळतात. जगभरात ही वनस्पती प्रसिद्ध असून अनेक लोक आवडीने ही वनस्पती लावतात.

Monika Lonkar –Kumbhar

Gardening Tips : वॉटर लिली ही एक सुंदर आणि आकर्षक वनस्पती आहे. या वॉटर लिलीमध्ये अनेक प्रकारचे रंग पहायला मिळतात. जगभरात ही वनस्पती उगवली जाते आणि लोक आवडीने ही वनस्पती लावतात. तलाव, कारंजे आणि बगीचा सजवण्यासाठी या वॉटर लिलीचा वापर केला जातो.

घरातील जुने सामान जसे की, टब, बादली, पाण्याचा मग यामध्ये तुम्ही वॉटर लिली लावू शकता. प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये आजकाल अनेक जण वॉटर लिली लावतात. वॉटर लिली तुम्ही घरात इनडोअर प्लॅंट म्हणून लावू शकता किंवा बाहेर देखील लावू शकता.

वॉटर लिली ही वनस्पती पाण्याचे शुद्धीकरण करण्यास, ऑक्सिजन प्रदान करण्यास आणि माशांव्यतिरिक्त पाण्यातील इतर जलचरांना आधार देण्यास मदत करतात.

विशेष म्हणजे वॉटर लिलीची फुले, पाने आणि मुळे यांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे, वॉटर लिलीचा वापर हा अनेक प्रकारच्या रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

आज आपण वॉटर लिली प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये कशा प्रकारे लावायची? याबद्दलच्या स्टेप्स जाणून घेणार आहोत.

प्लॅस्टिकच्या टब किंवा बादलीमध्ये अशा पद्धतीने लावा वॉटर लिली

  • सर्वात आधी तुम्हाला ज्या प्लॅस्टिकच्या टबमध्ये किंवा बादलीमध्ये वॉटर लिली लावायची आहे, तो टब किंवा बादली चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्या.

  • हा प्लॅस्टिक टब किंवा बादली १८ ते २० इंच असणे आवश्यक आहे.

  • त्यानंतर, दुसरा एक टब किंवा मातीचा वाडगे घ्या. जे ८ ते १२ इंच असायला हवे.

  • आता प्लॅस्टिक टब किंवा मातीच्या वाडग्यामध्ये माती भरा आणि त्यात वॉटर लिलीचे रोप लावा.

  • प्लॅस्टिक टब किंवा प्लॅस्टिक बादली अशा ठिकाणी ठेवा जिथे पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल.

  • आता तुमच्या आधीच्या १८ ते २० इंचाच्या प्लॅस्टिक टबमध्ये ५० टक्के पाण्याची पातळी असेल एवढ्या पाण्याने तो टब भरा.

  • आता पाण्याची लेव्हल मेंटेन करण्यासाठी त्यात वॉटर लिली बुडवा.

  • आता वॉटर लिलीची नियमित देखभाल करा आणि वनस्पतीची काळजी घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT