waxing  Sakal
लाइफस्टाइल

व्हॅक्सिंगनंतर त्वचा कोरडी पडलीय? करू नका दुर्लक्ष, अशी घ्या काळजी

waxing Tips: व्हॅक्सिंगनंतर त्वचा कोरडी पडत असेल तर पुढील गोष्टी करू शकता.

Puja Bonkile

Waxing Tips: हात आणि पायांवरचे नको असलेले केस काढण्यासाठी सर्वच महिला व्हॅक्सिंग करतात. अनेक महिला व्हॅक्सिंग करून घेण्यासाठी पार्लरमध्ये जातात, तर अनेक महिला घरी व्हॅक्सिंग करून घेतात. व्हॅक्सिंग मुळे हात आणि पायातील नको असलेले केस निघून जातात, तर अनेक महिलांची त्वचा व्हॅक्सिंगनंतर कोरडी पडते. जर तुमचीही त्वचा व्हॅक्सिंग केल्यानंतर कोरडी पडत असेल तर पुढील गोष्टी करू शकता.

 कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या 

त्वचा कोरडी पडत असेल तर ही समस्या टाळण्यासाठी सर्वात आधी व्हॅक्सिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

व्हॅक्सिंग करताना सर्वात आधी त्वचा स्वच्छ धुवावी  आणि त्यानंतर हात आणि पायावरचे केस काढावे. 

व्हॅक्सिंग करताना लक्षात ठेवा की व्हॅक्स जास्त गरम नसावे.

जर व्हॅक्स खूप गरम असेल तर व्हॅक्सगनंत त्वचा कोरडी होण्याची समस्या असू शकते. 

या कारणास्तव, व्हॅक्सच्या तापमानावर लक्ष ठेवा. 

हात आणि पाय व्हॅक्सिंग करताना पावडर वापरा.

पावडर वापरल्याने त्वचेतील ओलावा निघून जाईल.

यानंतर व्हॅक्सिंग करताना कोणतीही समस्या होणार नाही आणि त्वचा कोरडी होण्याची समस्याही राहणार नाही.

अशा प्रकारे वॅक्सिंग केल्याने त्वचा कोरडी पडणार नाही. 

व्हॅक्सिंग केल्यानंतर त्वचा थंड पाण्याने धुवू नका.

वॅक्सिंगनंतर त्वचा थंड पाण्याने धुतल्याने त्वचा कोरडी होऊ शकते.  

त्वचा कोरडी झाल्यास करा पुढील उपाय

व्हॅक्सिंगनंतर हात-पाय कोरडे होत असेल तर त्वचेला मॉइश्चरायझर लावावे.

वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा चांगली स्वच्छ करावी.

यानंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावा.

त्वचेला मॉइश्चराइझ करण्यासाठी साय, कोरफड जेल यासारख्या पदार्थांचा वापर करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT