premature baby google
लाइफस्टाइल

Premature baby : नियोजनपूर्व प्रसूतीनंतर बाळाची काळजी कशी घ्यावी ?

प्रीमॅच्युअर बाळाला नियमितपणे स्तनपान द्या. बहुतेक लोक गाईचे दूध त्या लहान बाळाला देतात. पण तुम्ही मात्र अस अजिबात करू नका.

दिपाली सुसर

मुंबई : आजकाल प्रीमॅच्युअर बेबी जन्माला येणे ही अगदी एक कॉमन गोष्ट झाली आहे. साधारणपणे 9 महिन्यांनी गर्भात बाळाचा जन्म होतो. पण आता खुप नवजात मुलांचा जन्म वेळेआधी होतो. त्यालाच प्रीमॅच्युअर बेबी म्हणतात.

डॉक्टर सांगतात की वेळेआधी जन्मलेल्या बाळाची विशेष काळजी घ्यावी.

जर तुमच्या घरात प्रीमॅच्युअर बाळाचा जन्म झाला असेल तर बाळाची काळजी कशी घ्यावी .हे सविस्तर जाणून घेऊया-

1)प्रीमॅच्युअर बाळाला नियमितपणे स्तनपान द्या. बहुतेक लोक गाईचे दूध त्या लहान बाळाला देतात. पण तुम्ही मात्र अस अजिबात करू नका.

2)किमान 6 महिने तरी लहान बाळाला आईचे दूध पाजावे. नंतर मग गाईचे दूध सुरु करावे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, प्रीमॅच्युअर बाळाला दिवसातून किमान 8 किंवा 10 वेळा दूध द्या.

3)एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोन वेळेमध्ये दुध देतांना किमान 2 तासांचे अंतर असावे. आणि 4 तासांपेक्षा जास्त फरक नसावा.

4)प्रीमॅच्युअर बाळाच्या आरोग्याकडे तुम्ही सतत लक्ष दया.

तसेच त्यांच्या बारीक हालचालीकडे विशेष लक्ष ठेवा. कारण प्रीमॅच्युअर बाळाचा विकास नीट होत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे.त्यामुळे तुम्ही मुलाच्या ऐकण्याच्या आणि पाहण्याच्या पद्धतीकडेसुध्दा लक्ष दया. यासाठी ठराविक अंतराने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

5)आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वेळेआधी जन्मलेल्या बाळाला खूप झोप येते. यासाठी घरातील वातावरण शांत ठेवा. जास्त आवाज करू नका. यामुळे बाळाच्या झोपेमध्ये अडथळा येऊ शकतो. सोबतच, लहान बाळाला नेहमी त्याच्या पाठीवर झोपु घालत चला.

वेळेआधीच जन्मलेल्या बाळाच्या मानेला उशी लावू नका.

6)लहान बाळाला कधी भूक लागते, कधी झोप येते? या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. लहान बाळाला कधीही एकटे सोडू नका.

7)बाळाला आंघोळ घालायची असेल तर कोमट पाण्याने आंघोळ करा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बालकांची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमकुवत असते. यासाठी बाळाला बाहेरच्या.वातावरणापासून दूर ठेवा.

सूचना - ही सामान्य माहिती आहे. जर तुमच्या बाळाला आजार किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT