लाइफस्टाइल

Kitchen Hacks: आता दूध उतू जाणार नाही; फक्त ट्राय करा या ट्रिक्स

दूध उतू जाऊ नये म्हणून वापरा या सोप्या ट्रिक्स

Aishwarya Musale

अनेकदा महिला स्वयंपाक घरात दूध गॅस वर ठेवलं की गॅस बंद करायला विसरतात. दूध जास्त वेळ उकळलं की ते भांड्यातून खाली पडू लागतं, अशा स्थितीत दुध वाया जातंचं पण ओटा, गॅस खराब होतं ते वेगळंच.

दूध गरम करणे ही प्रत्येकाची सर्वात मोठी समस्या आहे. प्रत्येकजण या समस्येने त्रस्त आहे. तुमच्या बाबतीतही असे घडतेय का, जोपर्यंत तुम्ही दुधाकडे पाहात आहात तोपर्यंत ते बाहेर पडणार नाही, पण तुम्ही काही कामात बिझी होताच दूध बाहेर सांडू लागते.

दुध खाली पडताना यापेक्षा गॅस साफ करण्यात जास्त त्रास होतो. महिला अनेकदा दूध उकळण्याच्या हॅक्सविषयी माहिती शोधत असतात. जर तुम्हालाही बऱ्याचदा या समस्येचा सामना करावा लागत असेल तर या हॅक्सबद्दल जाणून घ्या.

दूध उकळत असताना त्यात एक चमचा ठेवा. असे केल्याने दूध भांड्यातून बाहेर पडण्यापासून रोखता येते. याचे कारण असे की दुध उकळताना खूप दाब येतो आणि जेव्हा त्यात चमचा टाकला जातो तेव्हा दुधाला जास्त दाब येण्यापूर्वी वाफेला बाहेर पडण्याची जागा मिळते.

दूध उकळत असताना पातेल्यास तूप किंवा लोणी लावा. तुप लावल्याने भांड्यातून दूध बाहेर येत नाही. अशा स्थितीत तुमचे लक्ष दुधाकडे नसले तरी ते पडत नाही.

दुध उकळत असताना, भांड्यावर एक लाकडी स्पॅटुला ठेवा किंवा बेलन देखील ठेवू शकता. असे केल्याने पातेल्यातून दूध बाहेर येणार नाही.

दुधात पाणी शिंपडल्याने दुधाचे उकळणेही कमी होते आणि दूध उकळल्यानंतर भांड्यातून बाहेर पडत नाही.

याशिवाय, ज्या भांड्यात दूध उकळले जात आहे त्यात थोडे पाणी घाला आणि वरून दूध टाका आणि ते उकळण्यासाठी ठेवा.

दुधाला मध्यम ते मंद आचेवर उकळवा आणि दुधाच्या भांड्याचा आकार त्याच्या प्रमाणापेक्षा थोडा मोठा ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

अवघ्या ६ महिन्यात संपणार स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण, 'या' मालिकेची वेळ बदलली

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सने घरात घुसून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवले; डेव्हिड मिलरने ३ चेंडूंत फिरवली मॅच, गुणतालिकेत बदल

Phulambri News : शेतकऱ्यांच्या शेतातच मृत्यूचा सापळा..! लोंबकाळणाऱ्या वीजतारांनी वाढवला धोका; महावितरण विभागाचे दुर्लक्ष

Doordarshan Veteran Passes Away: दूरदर्शनच्या सुवर्णकाळावर मोहोर उमटविणारे ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक अरुण काकतकर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT