लाइफस्टाइल

Kitchen Hacks: भाजीत चुकून तिखट जास्त पडलं? टेन्शन घेऊ नका, या ट्रीक्स करा फॉलो

भाजीमध्ये जास्त तिखट पडल्यावर काय करावं? जाणून घ्या

Aishwarya Musale

भारतीय लोकांनी तिखट पदार्थ खायला आवडतं असले तरी एका मर्यादेपेक्षा जास्त तिखट सर्वजण खाऊ शकत नाही. त्यामुळे स्वयंपाक करता कोणताही पदार्थाला चांगली चव यावी म्हणून त्यात मिरची, तिखट किंवा मसाले टाकले जातात. पण जर याचे प्रमाण चुकूनही जास्त झाले तर सर्व पदार्थाची चव बिघडते. 

त्याच वेळी, अनेक वेळा लोक भाज्यांमध्ये लाल रंग येण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाल मिरच्या देखील घालतात. नंतर अशी भाजी खाणे अवघड होऊन जाते आणि मग तयार केलेली संपूर्ण भाजी फेकून द्यावी लागते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला भाजीतील तिखटपणा कमी करायचा असेल, तर चला जाणून घेऊया अशा काही टिप्स ज्याद्वारे तुम्ही भाजीतील तिखटपणा कमी करू शकता.

मध किंवा साखर वापरा

भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी तुम्ही मध आणि साखर वापरू शकता. यासाठी तुम्ही भाजीत थोडी साखर किंवा मध घाला. पण लक्षात ठेवा की मध किंवा साखर फक्त कमी प्रमाणात वापरली पाहिजे.

मैदा मिक्स करावे

जर ही करी असेल आणि त्यात खूप लाल तिखट असेल तर एक चमचा तेलात एक चमचा मैदा घालून हलके तळून घ्या आणि भाजीमध्ये घाला. भाजीत भाजलेला मैदा घातल्याने मिरचीचा भाजीवर होणारा परिणाम कमी होतो.

लिंबू

तिखट जास्त असल्यास लिंबाचा रस वापरावा. लिंबाचा आंबटपणा भाजीमध्ये असलेल्या मिरचीची चव कमी करतो, ज्यामुळे भाजी खाण्यायोग्य बनते. हे चव वाढवते आणि मसालेदारपणा कमी करते.

मलई किंवा दही

तुम्ही मलई किंवा दही घालून चव संतुलित करू शकता. भाजीमध्ये मलई किंवा दही घालून मंद आचेवर शिजवा. असे केल्याने भाजीतील मिरचीचा प्रभाव बर्‍याच प्रमाणात कमी होईल.

टोमॅटोची पेस्ट

भाजीमध्ये टोमॅटो पेस्ट टाकून तुम्ही भाजीचा तिखटपणा कमी करु शकता. तुमची भाजी घट्ट होईलच पण तिची चव देखील वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT