लाइफस्टाइल

Manali Tourism : हॉटेल-रिसॉर्ट सोडा... हनीमूनला रहा बर्फाच्या घरात; मनालीला इग्लूमध्ये राहण्यासाठी किती येईल खर्च?

हनीमूनला रहा बर्फाच्या घरात; मनालीला इग्लूमध्ये राहण्यासाठी किती येईल खर्च?

Aishwarya Musale

लोक अनेकदा त्यांच्या हनीमूनसाठी काही खास ठिकाणी जाण्याचा विचार करतात. पण प्रवासासोबतच ते चांगल्या हॉटेलचाही शोध घेतात. त्यांना अशा हॉटेलमध्ये राहायचे असते जिथे रुममधून सुंदर दृश्य दिसावे. त्यामुळे कपल लोकेशनसह आधी हॉटेलची निवड करतात.

कपल्सला हॉटेल निवडणे थोडे अवघड असते, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी काही खास लोकेशन्स घेऊन आलो आहोत. तुम्ही जोडीदारासोबत बर्फाच्या घरात राहू शकता. बर्फाच्या घरात राहणे तुमच्यासाठी आयुष्यभर संस्मरणीय असेल. या बर्फाच्या घरात एक दिवस राहण्यासाठी काय खर्च येईल? याबद्दलची सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगतो.

इग्लू हाऊस

हॉटेलऐवजी मनालीतील इग्लू हाऊसमध्ये राहण्याची संधी गमावू नका. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात तुम्ही इथे राहण्याचा प्लॅन करू शकता.

इग्लू हाऊसमध्ये एका दिवसासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपये मोजावे लागतील. या बर्फाच्या घरात दोन लोक आरामात झोपू शकतात.

येईल एवढा खर्च

जर तुम्हाला मनालीमध्ये इग्लू हाऊसशिवाय सर्व प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिटीचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्हाला त्यासाठी 18,000 रुपये मोजावे लागतील.

दोन्ही पॅकेजेसमध्ये, तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच, डीनर, एक बोनफायर आणि एक बार्बेक्यू दिले जाईल. अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये, तुम्हाला स्कीइंग, ट्यूब स्लाइडिंग आणि स्लेज स्लाइडिंग करण्याची संधी मिळेल.

जर तुम्ही बर्फाच्या घरात राहाल तर तुम्हाला थंड तापमानाबद्दल काळजी करण्याची गरज नाही. कारण इथे तुम्हाला अतिरिक्त ब्लँकेट, फोम मॅट्रेस आणि गरम पाण्याच्या बाटल्यांसह मऊ आणि उबदार स्लीपिंग बॅग देखील दिली जाते. हे पूर्णपणे आरामदायक आहे आणि तुम्हाला रात्री अजिबात थंडी जाणवणार नाही. याव्यतिरिक्त, जाड कपडे, हातमोजे आणि स्नो शूज देखील इग्लू घरामध्ये स्वतंत्रपणे प्रदान केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Farjan Dordi : बाबा फर्जनच्या घरातून जप्त केली सव्वा पाच कोटींची 'माया'; पण ती मोजताना बँक कर्मचारी अन् पोलिसांची का झाली दमछाक? बंगल्यावर रायफल, 6 हजार काडतूसंही सापडली

Women Farmers success story: महिला शक्तीचा नवा आदर्श! वरखेडीतील महिला गटाने इस्रायली तंत्रज्ञानातून फुलवली आधुनिक शेती, गटशेतीची यशोगाथा..

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवारांना आम्ही सर्व गोष्टी सांगतो, अजितदादांसारखं ट्यूनिंग वहिनींसोबतही आहे - सुनील तटकरे

Hormuz Strait बंद, भारतात पुन्हा गॅस सिलिंडरचा तुटवडा होईल? | LPG, Petrol-Dieselवर नेमका काय परिणाम?

Nashik Crime: लाडकी बहीणच्या पैशातून दागिने घेण्याचं आमिष दाखवलं, महिलेला पळवून नेत अत्याचार; एकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT